rajkiyalive

DATTA COLLECTION SALGRE : सलगरेत दत्त कलेक्शनचे सहा ऑक्टोंबरला उद्घाटन

dineshkumar aitawade 9850652056

DATTA COLLECTION SALGRE : सलगरेत दत्त कलेक्शनचे सहा ऑक्टोंबरला उद्घाटन : मिरज तालुक्यातील सलगरे येथे युवा उद्योजक विद्यानंद बिसुरे यांच्या दत्त कलेक्शन या भव्य दालनाचे रविवार सहा रोजी शुभारंभ होत आहे, अशी माहिती विद्यानंद बिसुरे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाल शुभारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे.

DATTA COLLECTION SALGRE : सलगरेत दत्त कलेक्शनचे सहा ऑक्टोंबरला उद्घाटन

यावेळी माजी आमदार अनिल कदम, आ. विक्रम सावंत, माजी आमदार अजितराव घोरपडे, श्र्रीमंततात्या पाटील, रोहितदादा पाटील, मनोज बाबा शिंदे, जे. के. बापू जाधव, सुरेश आहूजा, रामू शंकर देशींगे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, अनिल आमटवणे, मारूतीनाना चव्हाण, किशोर आहुजा, आश्विन साखरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील, सरपंच जयश्रीताई पाटील, सुरेश कोळेकर, शंकर गुंडेवाडी, बाबासो कुंडले, वैभव नलवडे, पिंटू निंबाळकर,आक्काताई अजेटराव, विजय पाटील, काकासो कुंडले, आप्पासो गोविंद कुंडले, विजयराव शिंदे, सुनील अभंगराव हेही उपस्थित राहणार असल्याचे सौ. रूपाली व विद्यानंद बिसुरे, सौ. वैशाली व नंदकुमार बिसुरे यांनी सांगितले.

रविवार सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे. सन 1994 पास्ाून श्र्री दत्त कलेक्शन ग्राहकांच्या सेवेत आहे. हे वस्त्रदालन आता सलगरे येथील कवठेमहांकाळ रोडवर तब्बल 25 हजार चौरस फुटाच्या नव्या सुसज्ज दालनात स्थलांतरीत होत आहे. सलगरे हे पंचक्रोशीतील व महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 10 ते 12 गावांचे व्यापारी केंद्र आहे. दैनंदीन वस्तु खरेदी, आठवडा, बाजाराच्या निमित्ताने या सर्व गावांचा सलगरे गावाशी संपर्क येतो. येथे उभारलेल्या श्री दत्त कलेक्शन वस्त्र दालनामुळे येथील ग्रामस्थ, नागरिकांना वस्त्र खरेदीची सोय होणार आहे. या दालनामध्ये सर्व वयोगटांसाठी आणि सर्व प्रकारची वस्त्रे उपलब्ध करून दिली आहेत. वस्त्र खरेदीसह अन्य दैनंदीन वापराच्या वस्तुही येथे खरेदी करता येणार आहेत. अशा प्रकारचे सुसज्ज वस्त्र दालन ग्रामीण भागात सुरू केल्याबद्द अनेकांनी बिसुरे यांचे कौतुक केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज