diliptatya patil news : दिलीपतात्यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा : सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपतात्या पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवरून राजकीय संन्यासाची घोषणा केल्याने चांगलेचे चर्चेत आले आहेत. त्यांनी खरोखरच राजकीय संन्यास घेतला की काय यासाठी त्यांचे फोन खनखणू लागले होते. त्यानंतर त्यांनी मी स्वत: आता राजकीय संन्यास घेतला आहे. मला आता राजकारणाचा कंटाळा आला आहे, असे सांगितले.
diliptatya patil news : दिलीपतात्यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
फेसबूकवर केली राजकीय संन्यासाची पोस्ट
याबाबत दिलीपतात्या पाटील म्हणाले, सध्याचे राजकारण पूर्ण बदलले आहे. जातीयवादी राजकारण आम्ही कधी पाहिले नव्हते, आता या राजकारणात गुदमरल्यासारखे वाटत आहे. कोणही उठतो आणि कोणत्याही प्रश्नावर बोलतो. राजकारणात चांगली स्थिरता राहिली नाही. कोणीही उठतो आणि कोणत्याही पक्षात जातो. त्याला काही विचार पाचार राहिला नाही. याचा उबग आला आहे. असले राजकारण आम्ही कधीच पाहिले नाही. गेल्या 50 वर्षात मी एकाच पक्षाशी एकाच विचाराशी बांधील आहे. राजारामबापू पाटील यांच्या कुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता असून, मी इतर दुसर्या कोणत्याच पक्षात जाणार नाही.
नव्या पिढीत आणि आमच्यात भरपूर गॅप आहे. आता उठायचे आणि दुसर्या पक्षात जावून पहिलीच्या वर्गात बसायचे हे आम्हाला पटणारे नाही. गेल्या 50 वर्षात भरपूर पदे भोगली आता मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही. आता माझे वय 75 झाले आहे. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी हा निर्णय पूर्वीच घेतला आहे. योगायोगाने एप्रिल आहे. परंतु हा एप्रिल फूल नाही. खरोखरच मी सध्याच्या राजकारणाला कंटाळलो आहे. माझी कोणावरही नाराजी नाही. मी अजूनही जयंत पाटील यांच्याबरोबरच आहे. त्यामुळे कोणीही यातून दुसरा अर्थ काढू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमचे नेते जयंत पाटील यांना मी सकाळीच भेटून राजकारणाचा कंटाळा आल्याचे सांगितले आहे.
कोण आहेत दिलीप पाटील?
ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या तालमीत दिलीत पाटील तयार झाले आहेत. शिक्षकाच्या पोटी जन्मलेल्या दिलीप पाटील यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षी राजारामबापू पाटील यांनी त्यांना कारखान्यात संचालक पदावर काम करण्याची संधी दिली होती. सलग 50 वर्षे ते कारखान्याचे संचालक होते. जनता दलाचे युवा प्रदेशाध्यपदही त्यांनी सांभाळले होते. बापूंबरोबर पदयात्रेत ते सहभागी झाले होते.
दिलीप पाटील वाळवा ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवल्यानंतर चर्चेत आले होते. राजारामबापू पाटील यांच्या अत्यंत जवळचे युवा नेतृत्व म्हणून दिलीप पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली होती. जयंत पाटील यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. 2015 मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाली. दिलीपतात्या पुढे सहा वर्षे अध्यक्षपदावर कायम राहिले. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर कायम विश्वास ठेवला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



