दूधगाव तालुका मिरज येथे 4 मे दरम्यान होणार्या जैन समाजाचा पंचकल्याणक जैन समाजाच्या श्रावक श्राविका यांनी सदर कार्यक्रमास समाजबांधवांसह अनेक श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्श्व ग्रुपच्या महिला ढोल पथक यासारख्या वादक घेऊन जोरदार वाद्यांनी मिरवणुक कार्यक्रमाला रंगत आणली.
dudhgaon news : दुधगाव येथे पंचकल्याणकचा मुहूर्तमेढ शुभारंभ उत्साहात.
प्रथम कर्मवीर चौक – चावडी चौक- जिन मंदिर या मार्गी मिरवणूक काढण्यात आली. जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या पवित्र सोहळ्याच्या प्रारंभानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि मंगलाचार करण्यात आले. जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचा उपस्थितीत मुहूर्तमेढ स्थापन व जिन मंदिराचे चौकट पूजन करण्यात आली.उपस्थित भाविकांनी उत्साहात जयघोष केला आणि हा सोहळा अध्यात्मिक वातावरणात पार पडला.
या नंतर पंचकल्याणक महामहोत्सव पूजेच्या जागी व सौधर्म इंद्र-इंद्रायणी यांच्या घरी देखील मुहूर्त मेढ करण्यात आले. पंचकल्याणक महामहोत्सव पंचकल्याणक महामहोत्सव हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सोहळा असून, त्याअंतर्गत भगवान महावीरांच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या घटनांचे उत्सव साजरे केले जातात. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
dudhgaon-news-the-muhurtamedha-of-panchakalyanam-begins-with-enthusiasm-in-dudhgaon
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकार्यांनी, श्रावक- श्राविकानी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण दुधगाव गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.गेली बरेच वर्ष अशी पंचकल्याण सोहळा असा होणार नाही खात्री दिली आहे..

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



