farmar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले : राज्यातील शेतकर्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरलंय का? असा प्रश्न आता सार्यांना पडला आहे. कारण राज्यातील शेतकर्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकर्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीचं दिलेले आश्वासन हवेत विरलंय, अशी चर्चा आहे.
farmar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले
दरम्यान याच मुद्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी करणे हा विषय माझ्या स्तरावरचा नसून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. असे म्हणत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आम्ही शेतकर्यांना कर्जमाफी करू, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नाही, असे ही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील बळीराजाची उपेक्षा झाल्याचे बोलले जात आहे.
शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन माझ्या ऐकण्यात नाही
राज्यातील शेतकर्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, अशा काही तक्रारी आल्या होत्या. 31 मार्च पर्यंत पैसे मिळतील, असे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार 2 हजार पाचशे कोटी रुपये शेतकर्यांना येत्या 2 ते तीन दिवसात मिळतील. मात्र शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही, यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री ड. माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. युरिया खत गैरप्रकार बाबत गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल. महापुरुष यांच्याबाबत वेडेवाकडे चर्चा करू नये आणि आपल्या अकलेचे तारे तोडू नये. याबत कायदा व्हायला पाहिजे, असे माझे देखील मत आहे. मात्र सोयाबीनला कमी दर मिळत नाहीये, अशा तक्रारी आल्या नाहीत असे ही कृषिमंत्री ड. माणिकराव कोकाटे म्हणाले.
farmar-news-farmers-loan-waiver-is-not-my-issue-agriculture-minister-manikrao-kokate-shrugged
पीक कर्जाबाबत काय म्हणालेत अजित पवार?
उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (ता.28) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यातील शेतकर्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार नाही, जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची जाहीर सभेत उजळणी करून दाखवली. पवार म्हणाले, पीक कर्जाचे 31 मार्चपूर्वी पैसे भरा. जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो. यावर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज भरा. असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



