जनप्रवास/विटा
विटा पोलिसांकडून गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश, गावडे बंधूसह सातजण गजाआड ; : विटा पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणार्या गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश केला असून बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळे प्रकाराचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडलेचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्क लिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट असे साहित्य जप्त केले.
विटा पोलिसांकडून गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश, गावडे बंधूसह सातजण गजाआड ;
बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जप्त
विटा पोलिसांकडून गावडे युनिर्व्हसिटीचा पर्दाफाश, गावडे बंधूसह सातजण गजाआड ; :याप्रकरणी विटा पोलिसांनी प्रमोद कृष्णात आमने (वय 29, रा. काळमवाडी ता.वाळवा जि.सांगली), शिवाजी नागनाथ यमगर (वय 31), काकासाहेब धोंडीबा लोखडे (वय 30, दोघेही रा. वाळवा), रामचंद्र भाऊ गावडे (वय 82) अर्जुन भाऊ गावडे (वय 52), गजानन रामचंद्र गावडे (वय 43 तिघेही रा. शिगांव, ता. वाळवा) व महेश महादेव चव्हाण (वय 52, रा.पेठवडगांव, ता.हातकणंगले, जि. कोल्हापुर) या सात जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिलेली माहिती अशी की, प्रमोद आमने याचे दहावीचे प्रमाणपत्र, खोटे तयार करुन पोस्टाचे डाकघर सहाय्यक डाकपाल शाखा नेवरी येथे नोकरी मिळवून ती जाईंड करुन भारत सरकारची व डाक विभागाची फसवणुक केली असल्याची फिर्याद विटा डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी विटा पोलिसांत दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
त्याप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता प्रमोद आमने याने नोकरी मिळविण्यासाठी शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांना 1 लाख 25 हजार रुपये दिले. यमगर व लोखडे यांनी नोकरीचे अमिष दाखवून प्रमोद आमने यास रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे व गजानन गावडे या गावडे बंधूकडुन बनावट बोर्ड सर्टिफिकेट प्राप्त करुन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे तपासाला गती देऊन शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांची विटा पोलिसांनी कस्टडी घेवून तपास केला असता शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांनी रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे व गजानन गावडे यांनी वेगवेगळ्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले तसेच बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला, व कोणतेही बनावट कागदपत्रे तयार करुन दिले असल्याचे सांगितले.
वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्या मुलांचे शाळेचे दाखले व बोर्डसर्टिफिकेट तसेच वेगवेगळ्या शाखेचे डिग्री सर्टिफिकेट मिळून आल्याने जप्त केले आहेत.
रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे व गजानन गावडे या गावडे बंधूंना पोलीस कस्टडीमध्ये घेवून तपास केला असता अर्जुन गावडे व गजानन गावडे यांच्या घरी वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्या मुलांचे शाळेचे दाखले व बोर्डसर्टिफिकेट तसेच वेगवेगळ्या शाखेचे डिग्री सर्टिफिकेट मिळून आल्याने जप्त केले आहेत. तसेच महेश चव्हाण हा संगणकमध्ये पारंगत असून तो गावडे बंधूना बनावट सर्टिफिकेट तयार करुन देत असुन त्यांच्या ताब्यातुन बनवुन देण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
बनावट सर्टिफिकेट व बनावट कागदपत्रे तयार करुन देण्यासाठी शिगांव (ता. वाळवा) येथील गावडे युनिर्व्हसिटी प्रसिध्द असुन या युनिर्व्हसिटीने अनेक वर्षापासुन अनेक लोकांना बनावट कागदपत्रे तयार करुन दिलेली आहेत. तसेच अनेक लोकांना या बनावट सर्टिफिकेटच्या सहाय्याने नोकरी मिळाली असण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना तपासासाठी बोलावून घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गावडे युनिर्व्हसिटी शिगांव येथुन बनावट कागदत्रे तयार केले असल्याचे सांगितले.
तसेच सन 2023 मध्ये इस्लामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या गावडे युनिर्व्हसिटीमध्ये असणारे रामचंद्र गावडे यांची ओळख गावडेसर या नावाने ओळख असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. तसेच सन 2023 मध्ये इस्लामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळे प्रकाराचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडलेचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्क लिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट असे साहित्य हस्तगत करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
कारवाईबाबत गोपनीयता
विटा पोलिसांनी एवढी मोठी कारवाई करून देखील पत्रकारांना या प्रकरणाची माहिती रात्री आठ वाजल्यानंतर दिली. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रकार तरी विटा पोलीस करत नव्हते ना ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे विटा पोलिसांच्या दिरंगाईचे नेमके कारण काय
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.