rajkiyalive

GOA MADE WINE : गोवा बनावटीच्या दारूची भेसळ करून महाराष्ट्रात विक्री

शिरढोण टोल नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

GOA MADE WINE : गोवा बनावटीच्या दारूची भेसळ करून महाराष्ट्रात विक्री : सांगली : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी चोरून मधून आणणार्‍या दोघांना सापळा रचून जेरबंद करण्यात आले. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली. या प्रकरणी सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक याठिकाणी देखील छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला.

GOA MADE WINE : गोवा बनावटीच्या दारूची भेसळ करून महाराष्ट्रात विक्री

सदरच्या दारूची तस्करी करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली असून या दोघांकडून कार आणि दारू सह 8 लाख 51 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षद नागनाथ जाधव आणि गणेश अशोक जाधव आणि संदेश शिवाजी पवार (तीघे रा. पाचेगाव बुद्रुक ता. सांगोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाने शनिवार दि. 18 मे रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्यावर सापळा लावला.
GOA MADE WINE : गोवा बनावटीच्या दारूची भेसळ करून महाराष्ट्रात विक्री :यावेळी संशयित जाधव हे कार (क्र. एमएच 03 ए झेड 5836) मधून त्याठिकाणी आले.

त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पाळून जाऊ लागले. यावेळी पथकातील कर्मचार्‍यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्की मध्ये गोवा बनावटीची गोल्डन एज नावाच्या दारूच्या 348 बाटल्या मिळाल्या. या दारुबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्या दारूची बनावट रित्या रॉयल स्टॅग आणि इम्पेरियल ब्ल्यू या दारूच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची चोरून विक्री करणार असल्याचे सांगितले.

GOA MADE WINE : गोवा बनावटीच्या दारूची भेसळ करून महाराष्ट्रात विक्री : त्यांच्याकडून दारू आणि कार असा एकूण 8 लाख 51 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी त्यांच्याकडील दारू जप्त करून अधिक तपास केला असता त्यांचा आणखी एक साथीदार संदेश शिवाजी पवार यांच्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि बनावट दारू मिळाली. यावेळी तिघांना अटक करून त्यांच्याकडून दारू आणि कार असा एकूण 8 लाख 51 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज