rajkiyalive

grampanchat election news : कोथळी, कवठेसारमध्ये महिला सरपंच होणार तर दानोळी झाले खुले

grampanchat election news : कोथळी, कवठेसारमध्ये महिला सरपंच होणार तर दानोळी झाले खुले : तालुक्यातील 52 ग्रामपंचायतिच्या सन 2025 – 2030 या पंचवार्षिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी जाहीर केली. यामध्ये 52 ग्रामपंचायती पैकी 26 महिला, 26 पुरुष सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

grampanchat election news : कोथळी, कवठेसारमध्ये महिला सरपंच होणार तर दानोळी झाले खुले

शिरोळ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

दरम्यान , या पंचवार्षिक निवडणुकातील सरपंच पदाचे आरक्षण गृहीत धरून इच्छुकानी तयारी सुरू ठेवली होती मात्र आरक्षणातील संधी हुकल्याने बरेच इच्छुकांची नाराजी दिसून आली. आरक्षणानंतर बहुतांशी गावातील सरपंच पदासाठी इच्छुक असणार्‍यामध्ये कही खुशी, कही गम असे वातावरण पहायला मिळाले.

शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते नागरिक आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुरुवातीला तहसीलदार हेळकर यांनी आरक्षण पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी अनुसूचित जातीसाठी बूबनाळ, अब्दुललाट, अर्जुनवाड अकिवाट, शिरटी गावासाठी तसेच अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी राजापूरवाडी, शिवनाकवाडी, लाटवाडी, उदगाव, टाकवडे हे गाव आरक्षित झाले. अनुसूचित जमाती साठी मौजे आगर, टाकळीवाडी या दोन गावापैकी अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी मौजे आगर हे गाव चिठ्ठीद्वारे काढण्यात आले .

त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात हेरवाड, जैनापुर, उमळवाड, तेरवाड, राजापूर, घालवाड, जुनेदानवाड तर ना मां प्र महिलामध्ये दत्तवाड, औरवाड, नवेदानवाड, यड्राव, बस्तवाड, आलास, संभाजीपुर हे आरक्षण झाले आहे.

त्याचबरोबर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलामध्ये कवठेसार, कोथळी, कुटवाड, नांदणी, शिरढोण, शेडशाळ, गणेशवाडी, कोंडीग्रे, हरोली, शिरदवाड, जांभळी, नृसिंहवाडी, खिद्रापूर, तर सर्वसाधारणमध्ये चिंचवाड, कनवाड, तमदलगे, हसूर, धरणगुत्ती, कवठेगुलंद, घोसरवाड, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, मजरेवाडी, गौरवाड, टाकळी या गावांचा आरक्षणासाठी समावेश आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज