rajkiyalive

Grampanchyat election : ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १५ जुलैला सोडत

 

सांगली जिल्ह्यात ६९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १५ जुलैला सोडत

Grampanchyat election : ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १५ जुलैला सोडत : जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत ६९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिनांक ८ जुलै रोजी आदेश काढले असून, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.

सांगली जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहेत —

  • मिरज: ६४
  • तासगाव: ६८
  • कवठेमहांकाळ: ५९
  • जत: ११६
  • खानापूर- विटा: ६४
  • आटपाडी: ५३
  • कडेगाव: ५४
  • पलूस: ३३
  • वाळवा: १४४
  • शिराळा: ९१

या आरक्षण प्रक्रियेमध्ये अनुसूचित जातींसाठी ८४३ जागा, अनुसूचित जमातींसाठी ५ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८८ जागा व खुल्या प्रवर्गासाठी ४२० जागा राखीव करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सर्व ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करताना तालुकानिहाय आरक्षण सोडत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज