rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपूर मतदारसंघात माझ्याएवढे मताधिक्य सत्यजित पाटील यांना देणार

 इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील समवेत सत्यजित पाटील सरूडकर, प्रा.नितीन बानूगडे-पाटील, प्रतिक पाटील, विराज नाईक, अँड.चिमण डांगे, विजयराव पाटील, अभिजित पाटील, वैभव शिंदे व मान्यवर

इस्लामपूर : प्रतिनिधी

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपूर मतदारसंघात माझ्याएवढे मताधिक्य सत्यजित पाटील यांना देणार : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही. विनाकारण अपप्रचार केला जात आहे. जिल्ह्यात काहीही झाले, तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही. आपल्या पक्षाने 13 जागांची मागणी केली होती. मात्र आपणास 10 जागा मिळाल्या. 3 जागा सोडव्या लागल्या. जागा वाटपात जे झाले ते झाले, सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात व्यक्त केली. मला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे मताधिक्य मिळते, तेवढे मताधिक्य सत्यजित पाटील सरूडकर यांना देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

HATKANANGLE LOKSABHA : इस्लामपूर मतदारसंघात माझ्याएवढे मताधिक्य सत्यजित पाटील यांना देणार

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी माझा काहीही संबंध नाही : आ.जयंत पाटील

जिल्ह्यात काहीही झाले, तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही

इस्लामपूर येथे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार माजी आ.सत्यजित पाटील, श्रीमती सरोज पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख प्रा.नितीन बानूगडे- पाटील, जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, युवा नेते प्रतिक पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. आ.पाटील म्हणाले, आपण गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, याचे भान ठेवून कामाला लागा.

भाजपाने गेल्या दहा वर्षात देशावर 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे.

हे कर्ज फेडण्यासाठी ते निवडणुका झाल्यावर 18 टक्के जीएसटी आणि इतर कर वाढवू शकतात. सर्वांना बरोबर घेऊन बुथवाईज प्रचाराचे प्रभावी नियोजन करावे. शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने सहभागी करून घ्या. कोणी घरी येऊन बसले, चहाला आले हे टाळा. आपल्या मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादे काम झाल्याचे दिसत नाही. सत्यजित पाटील यांना दहा वर्षाच्या अनुभव आहे. ते केंद्र सरकारकडून अनेक विकासकामांना नक्की गती देऊ शकतात.

सत्यजित पाटील म्हणाले, भाजपाने गेल्या 10 वर्षात केवळ घोषणा आणि जाहिराती केल्या.

सामान्य माणसाच्या हातात काहीही पडले नाही. मी 10 वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. आपणा सर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघाच्या विकासाला चालना देईन. मी पक्ष, नेतृत्व आणि सामान्य जनतेशी 100 टक्के ईमान राखेन.
प्रा.नितीन बानूगडे-पाटील म्हणाले, भाजपाने शिक्षणाची वाट लावली असून देशातील 46 कोटी युवकांचे भवितव्य अंधारात आहे. देशातील बुद्धीवान युवक, श्रीमंत लोक देश सोडत आहेत. भाजपच्या काळात देश महासत्ता बनू शकत नाही. देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आपणास लढावे लागेल. सर्व सामान्य माणसाचे डोळे उघडले असून भाजपाचा पराभव अटळ आहे.

अभिजित पाटील म्हणाले, वाळवा व शिराळा हे आघाडीचे बालेकिल्ले आहेत.

आमच्यामध्ये काही संघर्ष असला,तरी हातात हात घालून गद्दारास धडा शिकवू. प्रतिक पाटील म्हणाले, देशात येऊ पाहणारी हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. यावेळी श्रीमती सरोज पाटील, माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, आष्टयाचे नेते वैभव शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, माजी सभापती खंडेराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, शिवसेनेचे शकील सय्यद, भूषण भासर, पोपट भानुसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.शामराव पाटील, विनायक पाटील, विजयराव यादव, बाळासाहेब पाटील, झुंझारराव पाटील, बी.के.पाटील, आनंदराव पाटील, माजी सभापती वैभव पाटील, छाया पाटील, अरुणादेवी पाटील, शिवाजी चोरमुले, शिवसेनेचे उदय सरनोबत यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुशांत कोळेकर, सौरभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले. नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज