rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : धैर्यशील माने यांचा पराभव दिसल्यानेच महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली

अपयशाचे खापर निशिकांत पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा आरोप

फोटो-पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड.शमसूद्दीन संदे, पोपट मोरे, भागवत जाधव, शिवाजी पाटील

इस्लामपूर : प्रतिनिधी

HATKANANGLE LOKSABHA : धैर्यशील माने यांचा पराभव दिसल्यानेच महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली : महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा पराभव दिसू लागल्यानेच इस्लामपूर मतदारसंघातील महायुतीचे स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केली.

HATKANANGLE LOKSABHA : धैर्यशील माने यांचा पराभव दिसल्यानेच महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली

संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड.शमसूद्दीन संदे, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. संदे म्हणाले, महायुतीने साम, दाम, दंड, भेद आयुधांचा वापर करूनही उमेदवार विजयी होत नाही, याची त्यांना खात्री पटली आहे. अपयशाचे खापर कोणावर फोडायचे म्हणून निशिकांत पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केल्याचा कांगावा सुरू आहे. सर्वसामान्यांच्या जीवावर शेट्टी यांनी निवडणूक लढवली. हातकणंगले मतदारसंघातील एकाही प्रस्थापित नेत्याची सहानुभूती त्यांना मिळाली नाही.

भागवत जाधव म्हणाले, सामान्य मतदारांच्या, शेतकर्‍यांच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी लढले.

निवडणूक लढवण्यासाठी 50 रुपयांपासून ते एक लाख रुपयापर्यंतची मदत सामान्य लोक, ऊस उत्पादकांनी केली. स्वाभिमानी संघटना, प्रहार संघटनेसह विविध सामाजिक संस्थांनी प्रचार यंत्रणा राबवली. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रचार केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. पराभवाच्या शंकेने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

धैर्यशील माने यांनी 8200 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा कांगावा केला;

मात्र तरीही अखेरच्या टप्प्यात माने तिसर्‍या क्रमांकावर जाणार याची विरोधकांना जाणीव झाल्यानेच आरोप सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपये मतदारसंघात आणले, मात्र ते मतदारांपर्यंत पोहोचले नसल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे. हे पैसे कसे पचवायचे म्हणून त्यांच्यात आपापसात भांडणे लागली आहेत. पोपट मोरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेट्टी यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला.

विद्यमान खासदार फिरकले नाहीत. सरूडकरांचा निर्णय अंतिम टप्प्यातला होता.

त्यांचा विषयच नाही. मतदारसंघात मुख्यमंत्री तळ ठोकून होते, याचे सामान्यांना कोडे आहे. त्याला आर्थिक संशयाची झालर आहे. शिवाजी पाटील म्हणाले, सर्वसामान्यांनी ही निवडणूक लढवली. वरपर्यंत पराभवाचा सुगावा पोचल्याने खर्च केलेल्या पैशाची चौकशी होण्याच्या भीतीतून निशिकांत पाटील यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबासाहेब सांद्रे, प्रताप पाटील, नितीन चौगुले, प्रकाश माळी, मानसिंग पाटील, उत्तम पाटील, आकाश साळुंखे, विक्रांत कबुरे, सचिन यादव, रमेश पाटील उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज