DINESHKUMAR AITAWADE 9850652056
HATKANANGLE LOKSABHA : एकला चलो रे म्हणणार्या शेट्टींना पुन्हा पुन्हा मातोश्रीचा मोह का? : अखेर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. 7 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील बर्यापैकी निवडणुका होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदार संघात हायहोल्टेज सामना होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला समान अंतरावर ठेवून एकला चलो रे म्हणणार्या माजी खासदार राज्ाू शेट्टींना पुन्हा पुन्हा मातोश्री का आठवत आहे, हे सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे.
HATKANANGLE LOKSABHA : एकला चलो रे म्हणणार्या शेट्टींना पुन्हा पुन्हा मातोश्रीचा मोह का?
2009 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार असलेल्या राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या जिवावर लोकसभेचे मैदान मारून देशात इतिहास निर्माण केला. पाच वर्षात त्यांनी भरीव कामगिरी करून शेतकर्यांचा कैवारी हा मान मिळविला. पुन्हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराची दिशा बदलली. सत्तेशिवाय तरणोपाय नाही हे मनाशी ठरवून त्यांनी भाजपची जवळीक साधली. मोदी लाटेच्या करिष्म्याने पुन्हा एकदा त्यांनी खासदारकी मिळवली. बलाढ्य असणार्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. राज्यातही भाजपचे सरकार आले . राजू शेट्टींचे सहकारी सदाभाउ खोत यांना आमदारकी मिळाली आणि लाल दिव्याची गाडीही मिळाली. दुसरे सहकारी रविकांत तुपकर यांनाही लाल दिव्याची गाडी मिळाली. आणि येथेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ठिणगी पडली. सदाभाउंनी सवतासुभा मांडला आणि रयत क्रांतीची स्थापना केली. रविकांत तुपकर हेही बाजूला झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजृ शेट्टींना भाजपशी पंगा घेतला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्याजवळ गेले.
येथेेही त्यांचा पराभव झाला. धैर्यशील माने यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून राजू शेट्टी यांची खासदारकीची हॅट्ट्रीक चुकवली. त्यामुळे येथून पुढे कोणत्याही पक्षाबरोबर युती करायची आही. महायुती आणि महाविकास आघाडी यांना समान अंतरावर ठेवायचा असा त्यांनी चंग बांधला. अनेक ठिकाणी झालेल्या बैठकांमध्येही कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत युती करू नका, असे राजू शेट्टींना ठणकावून सांगितले. राजू शेट्टींनीही एकला चलो रेही भूमिका घेतली आणि प्रचाराला सुरूवातही केली.
या अगोरदही एकदा राजू शेट्टी आणि उध्दव ठाकरे यांंची मातोश्रीवर भेट झाली होती.
त्यावेळी हातकणंगले मतदार संघ स्वाभिमानीसाठी सोडण्याची तयारी उध्दव ठाकरे यांनी केली होती. परंतु मला तुमचा केवळ पाठिंबा हवाय, तुमचा बॅनर नको, तुमचे व्यासपीठ नको असे वारंवार राजू शेट्टी म्हणायचे. त्यामुळे शिवसेनेनेही आपला विचार बदलला आणि येथे उमेदवार उभा करण्यासाठी चर्चा सुरू झाल्या. शाहूवाडी पन्हाळा मतदार संघांचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू झाली. भाजपनेही या मतदार संघावर आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचे सांगून विनय कोरे, राहूल आवाडे, शौमिका आवाडे यांची नावे भाजपने पुढे केली आहेत.
शिंदे गटानेही धैर्यशील माने यांच्याबरोबर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाला पंसती दिल्याचे कळते.
अधुमधून जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत येत आहे. त्यामुळे या मतदार संघात हाय होल्टेज लढत होणार यात काही शंका नाही. दुरंगी म्हणता म्हणना तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजू शेट्टी पुन्हा एकदा मातोश्रीवर जावून धडकले आहेत.
राजू शेट्टी यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवा असे उध्दव ठाकरे सांगत आहेत.
परंतु राजू शेट्टी यांनी ही अट मान्य केली नाही. मशाल या चिन्हावर लढले तर शिवसेनेत गेल्यासारखे होईल आणि याचा परिणाम मतदार संघावर होईल, अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि उमेदवार उभा करू नये, अशी त्यांची मागणी आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीला समान अंतरावर ठेवणार्या राजू शेट्टींना मातोश्रीवर जाण्याची गरज का पडली असा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्यांना पडला आहे.
सर्वच मतदार संघातील सर्वच आमदार जर विरोधात असले तर….
हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजी मतदार संघात प्रकाश आवाडे आणि शाहूवाडी पन्हाळा मतदार संघात विनय कोरे हे महायुतीचे आमदार तर हातकणंगलेमध्ये राजू आवळे, शिराळामध्ये मानसिंगराव नाईक आणि इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. हे सहाही आमदार सध्यस्थितीला राजू शेट्टींच्या विरोधात आहेत. जयंत पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्याशी शेट्टींची दुश्मनी जगजाहीर आहे. सर्वच मतदार संघातील सर्वच आमदार जर विरोधात असले तर आपली पंचाईत होईल अशी त्यांना भिती वाटत आहे, काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
एकला चलोरे म्हणत प्रचार सुरू असताना राजू शेट्ट्ींना आपुलकी मिळत होती.
सर्वांच्या अगोदर त्यांनी प्रचारयात्रा सुरू केली होती. बर्याच ठिकाणी ते पोहोचलेही होते. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांपासून दूर झालो आहोत असे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा राजू शेट्टी मातोश्रीवर जावून धडकल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.




Related

SANGLI LOKSABHA : ना शिवसेना-ना राष्ट्रवादी, संजयकाका एकला चलो रे…
जनप्रवास । अनिल कदम SANGLI LOKSABHA : ना शिवसेना-ना राष्ट्रवादी, संजयकाका एकला चलो रे... : सांगली ः सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत जागेचा तिढा सुरू असतानाच भाजपने आपली तिकीट जाहीर करून टाकले. भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देऊन पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्याचा फायदा घेण्याचा संजयकाकांचा प्रयत्न आहे. मात्र…
In "लोकसभा 2024"

HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले : सांगली : अखेर लोकसभा 2024 चा निकाला लागला. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रा लक्ष्यवेधी आणि अटीतटीचा ठरलेला हातकणंगले लोकसभा मतदार संघात अगदी अनपेक्षितरित्या धैर्यशील मानेंनी दुसर्यांदा मुसंडी मारली. इचलकरंजी विधानसभा मतदार संघानेच त्यांना तारले. आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांना…
In "लोकसभा 2024"

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला
dineshkumar aitawade 9850652056 HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला : मतदार संघात प्रचंड नाराजी, गेल्या पाच वर्षात कोणताही संपर्क नाही, विकासकामांचा तर पत्ताच नाही, अशाही परिस्थिीतीत मिरज पश्चिम भागात धैर्यशील माने यांना 9 हजार 377 मते मिळाली. याला एकमेव कारण म्हणजे कवठेपिरानचे माजी जिल्हा परिषद…
In "राजकारण"