rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील : आ.जयंतराव पाटील

इस्लामपूर

HATKANANGLE LOKSABHA सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील : आ.जयंतराव पाटीलभाजपा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 37 टक्के मते घेऊन देशाच्या सत्तेत आले होते. मात्र या निवडणुकीत ते 32-33 टक्क्यां पर्यंत खाली आल्यास,ते देशातील सत्तेतून जाऊ शकतात,असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केले. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आपल्या सर्वांच्या कष्टाने सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

HATKANANGLE LOKSABHA सत्यजित पाटील (आबा) हे चांगल्या फरकाने विजयी होतील : आ.जयंतराव पाटील

इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या आभार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ.सत्यजित पाटील,सांगली जिल्हा मध्य.बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगभाऊ नाईक,युवा नेते प्रतिकदादा पाटील,युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विजयराव पाटील,शहाजी पाटील,देवराज पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने, देवराज देशमुख,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शकील सय्यद,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे,संदीप जाधव,कॉ.धनाजी गुरव प्रामुख्या ने उपस्थित होते.

आ.पाटील पुढे म्हणाले,हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्याची शिफारस आम्ही केली होती.

ते उध्दवजी ठाकरे यांना दोनदा भेटूनही आले होते. मात्र त्यानंतर चित्र वेगळे झाले. आम्ही सत्यजित पाटील यांच्या नावाची शिफारस केली. उध्दवजी ठाकरे यांनी त्यांना बोलावून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्या नंतर राजू शेट्टी यांनी आ.बंटी पाटील यांच्या कडे आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करून पत्राचा मसुदाही दिला. मात्र त्यानंतर उध्दवजी ठाकरे यांनी आपला निर्णय कायम ठेवला.

सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडतात. मात्र सध्याचे अपक्ष उमेदवार आहेत,त्यांच्या नावाची मी शिफारस केली होती.

मात्र शिवसेनेच्या कोल्हापूर, हात कणंगले या जागा छ.शाहू महाराज व राजू शेट्टी यांना देणार असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. राज्यातील 48 जागा मध्ये भाजपास 12-15 पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत,असे आजचे चित्र आहे. आता विधानसभेची निवडणूक आहे. ताकदी ने कामाला लागा. मतदार याद्यावर लक्ष ठेवा,बुथच्या कामास अधिक गतिमान करा. मी आता जे काही 8-10 दिवस मिळाले आहेत,त्यामध्ये मतदार संघाचा संपर्क दौरा करणार आहे. येत्या काही दिवसात युवक, महिला,कामगार,सामाजिक न्याय मेळावे घ्या. आपल्या राष्ट्रवादी कार्यालयात सरकारी फी मध्ये सर्व दाखले देण्याची व्यवस्था केली आहे,त्याचा लाभ लोकांना द्यावा.

आ.मानसिंगभाऊ नाईक म्हणाले,सत्यजित पाटील आबा यांचा विजय निश्चित आहे.

त्यांच्या विजयात आपले कष्ट,योगदान मोलाचे ठरले आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राज्यात 100 पेक्षा जादा सभा घेतल्या, मात्र त्यांनी आपणास पूर्ण वेळ दिला आहे.
भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था,विधान सभा निवडणूका आहेत. आपण सर्वांनी योग्य समन्वय व लोकांशी सुसंवाद-संपर्क ठेवत या निवडणुकांना सामोरे जाऊया.

सत्यजित पाटील (आबा) म्हणाले,आपण माझ्या प्रचारासाठी जे कष्ट घेतले,ते मी मरे पर्यंत विसरणार नाही.

मला खासदार म्हणून संधी मिळाल्यास आपणास पश्चाताप होणार नाही,याची ग्वाही देतो. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी राज्याच्या प्रचारात फिरत असतानाही आपल्या मतदारसंघातील यंत्रणा पूर्णपणे हाताळली आहे. एक शिस्त बध्द प्रचार यंत्रणा आपल्याकडे अनुभवायला मिळाली. विरोधकांच्या पैशाचा आपल्या मतदारसंघात परिणाम होणार नाही.

यावेळी शिवसेनचे अभिजित पाटील, शकील सय्यद,काँग्रेस पक्षाचे संदीप जाधव, कॉ.धनाजी गुरव,महिला राष्ट्रवादीच्या सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,बी.के. पाटील,संग्राम फडतरे,देवराज देशमुख, पुष्पलता खरात,गोटखिंडीचे माजी सरपंच विजयराव लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले. नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रा.शामराव पाटील,नेताजीराव पाटील,विनायक पाटील,विजयराव यादव, शशिकांत पाटील,दादासाहेब पाटील, पै.भगवान पाटील,खंडेराव जाधव,आनंदराव पाटील, सुभाषराव सुर्यवंशी,अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील,रोझा किणीकर,कमल पाटील,शिवसेनेच्या योजना पाटील,उदयसिंह सरनोबत,मानव गवंडी,काँग्रेसचे अँड.आर. आर.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिकदादा पाटील यांच्या नावाचा बोलबाला।

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारां च्या प्रचारासाठी राज्यात 104 सभा घेतल्या. यावेळी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन संपूर्ण इस्लामपूर मतदारसंघ पिंजून काढला. संपूर्ण प्रचार यंत्रणा हाताळली असल्याचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासह सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज