rajkiyalive

हातकणंगलेत पुन्हा माने तर कोल्हापुरात मान गादीलाच

कोल्हापूर :

हातकणंगलेत पुन्हा माने तर कोल्हापुरात मान गादीलाच : अत्यंत चुरशीच्या झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेवटपर्यंत निकाल मागेपुढे होत होता. अखेर शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी विजय मिळवला तर कोल्हापूरकरांना आपला मान गादीलाच असल्याचे दाखवून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदार संघात सर्वांचे लक्ष होते. एक्झिटपोलमध्ये कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना तर हातकणंगलेची जागा सत्यजित पाटील सरूडकरांना दाखविण्यात आली होती. परंतु हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंनी बाजी मारली तर कोल्हापूरात शाहू महाराज लाखाच्या फरकाने निवडून आले.

हातकणंगलेत पुन्हा माने तर कोल्हापुरात मान गादीलाच

अखेरच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत शिंदेसेनेचे धैर्यशील माने 14 हजार 723 मतांनी विजय झाले. त्यांनी 15 व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला. एकला चलो रे अशी भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

हातकणगले लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत ही शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यामध्ये झाली. तिन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असल्याने निकाल कसा असणार याची कमालीचे उत्सुकता होती.

आज येथील राजाराम तलावा जवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सु रुवातीपासूनच मतदानामध्ये मतदानाचे आकडे कुतूहल वाढवणारे ठरले . पहिल्या फेरीमध्ये सत्यजित पाटील यांना 20,923 तर धैर्यशील माने यांना 20857 मते मिळाली. या दोघांच्या तुलनेत राजू शेट्टी यांना 11,312 इतकी मते मिळाली. त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये सुमारे एक ते दीड हजार मते पाटील यांना मिळत गेली. मात्र मताधिक्यामध्ये फार मोठी वाढ नव्हती.पंधराव्या फेरी अखेरपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम टिकवली. त्यानंतर मात्र मतमोजणीला कलाटणी मिळाली. 16 व्या
फेरीपासून धैर्यशील माने यांच्या मतांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ लागली.

विशेषतः इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघात त्यांना चांगली पसंती मिळाल्याचे आकडेवारी मधून दिसत होते. अखेर 24 व्या फेरी मध्ये माने यांनी 14 हजार 723 मताधिक्य घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केला.

दुसर्‍यांदा खासदार प्रथा कायम
हातकणंगले मतदार संघात सलग पाच वेळा काँग्रेसचे बाळासाहेब माने खासदार होते. त्यांच्या नंतर कल्लाप्पांना आवाडे, निवेदिता माने व राजू शेट्टी हे खासदार झाले. या तिघांनीही सलग दोन वेळा निवडून येण्याची कामगिरी केली होती. तीच प्रथा धैर्यशील माने यांच्या विजयानंतर कायम राहिली.

सोळाव्या फेरीपासून धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्यानंतर महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्याआधी सत्यजित पाटील यांनी आघाडी कायम ठेवली असल्याने महाविकास आघाडी कडून जल्लोष सुरू होता. गुलाबाची उधळण केली जात होती. परंतु अखेर या काटाजोड लढतील धैर्यशील माने यांनी विजय निश्चित केल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी , मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला जात होता.

धैर्यशील माने यांना 518334, तर सत्यजित पाटील यांना 504181 मते मिळाली. राजू शेट्टींना 1 लाख 78 हजार 866 मते मिळाली तर वंचितच्या डि. सी. पाटील यांना केवळ 32 हजार 591 मते मिळाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज