rajkiyalive

highway accident news : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील 6 जण ठार

highway accident news : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील 6 जण ठार : कर्नाटकातील बेंगलोर जवळ एका भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मयत सर्व जण एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.

highway accident news : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बंगळुरू येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हृदय हादरवणारी दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटून कारवर आदळल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामधील एकाच कुटुंबातील सहा जण मृत्यूमुखी पडलेत.हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जत येथील गावाला निघालेल्या हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणाच होत्याचं नव्हतं झालं मृतांमध्ये तीन मोठ्या माणसांचा तर दोन लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे . एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रम इगाप्पागोळ ( वय 46) हे मूळचे जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते.ख्रिसमसच्या सुटीनिमित्त चंद्र इगाप्पागोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्याच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते.यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला.

त्यामुळे त्यांची कार कंटेनरखाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचा मृत्यू झाला.बंगळुरु जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली.चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत.ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते,या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

चंद्रम इगाप्पागोळ (वय 45), त्यांची पत्नी धोराबाई (वय 40) मुलगा गण (वय 16), मुली दिक्षा (वय 10), आर्या (वय 6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर एकच शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दु:खाचा मोठा आघात झाला आहे.अपघातानंतर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज