rajkiyalive

मी चित्रपटात दरोडेखोर होतो पण मरणार नाही

(DINESHKUMAR AITAWADE)

MARUTI MANE : मारूती मानेंनी भालजी पेंढारकरांना दिला नकार…

कवठेपिरानचे सुपूत्र हिंदकेसरी मारूती माने यांनी कुस्ती क्षेत्राबरोबर राजकीय कारकिर्दही गाजवली. कवठेपिरानचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, वसंतदादा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तसेच राज्यसभेवर खासदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द गाजली.

 

 

तरूणपणात जाकार्तावीर आणि हिंदकेसरी झालेल्या मारूती माने यांना पाहण्यासाठी गावोगावी गर्दी व्हायची. लालबूंद चेहरा, भरपूर उंची असलेल्या मारूती माने यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना पहातच रहावे असे सर्वांना वाटायचे. मारूती मानेंची भूरळ मराठी चित्रपट सृष्टीतील पितामह भालजी पेंढारकर यांनाही पडली. मराठी चित्रपट सृष्टीचा त्यावेळी सुवर्णकाळ होता.

मारूती माने यांनीही भालजी पेंढारकरांच्या विनंतीला मान देवून कोल्हापूरला त्यांना भेटावयास गेले.

आपल्या एखाद्या चित्रपटात मारूती माने असावेत असे भालजींना वाटायचे. त्यांनी आपली ही कल्पाना आपल्या सहाय्यकाला सांगितली आणि मारूती मानेंची वेळ मागून घेतली. मारूती माने यांनीही भालजी पेंढारकरांच्या विनंतीला मान देवून कोल्हापूरला त्यांना भेटावयास गेले. दोघांच्यात तासभर चर्चा झाली.

मारूती मानें यांना खलनायकाची भूमिका देवू केली

भालजी पेंढारकरांनी आपला मानस हिंदकेसरी मारूती माने यांना बोलून दाखविला. भालजींनी मारूती मानें यांना खलनायकाची भूमिका देवू केली होती. त्या काळात मराठी चित्रपटातील खलनायक हातात फरशी घेवून दरोडे टाकायचे, लोकांना लुटायचे असे काम करीत असत. मारूती मानेंनी भूमिका करण्याचे मान्य केले परंतु मी शेवटी मरणारही नाही, आणि पोलिसांना शरणही जाणार नाही, अशी त्यांची अट होती.

 

खलनायकाचा मृत्यू झाल्याशिवाय चित्रपट संपवायचा कसा?

आता भालजींची पंचाईत झाली. खलनायकाचा मृत्यू झाल्याशिवाय चित्रपट संपवायचा कसा असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी मारूती मानेंना भरपूर समजावले परंतु मानेंनी ऐकले नाही, अशा प्रकारे मारूती मानेंना चित्रपटात पाहण्याची संधी रसिकांची हुकली.

मारूती माने यांनी तत्कालिन म्ाुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनाही आपला हिसका दाखविला

हिंदकेसरी मारूती माने यांनी आपल्या कवठेपिरानचे नाव सातासमुद्रापार नेउन ठेवले आहे. राजकारणातही त्यांनी आपले नाव कोरले आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या मारूती माने यांनी तत्कालिन म्ाुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनाही आपला हिसका दाखविला होता.
5 मार्च 1972 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या.

हिंदकेसरी मारूती माने त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते. वसंतदादा पाटील यांच्या सोबत कायम ते सावली सोबत असायचे. वसंतदादा पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या सर्वात जास्त जागा या निवडणुकीत मिळाल्या. 270 पैकी 222 जागांवर काँग्रेस विजयी झाले.

मारूती मानेंनी शंकरराव चव्हाणांच्या कानफटीत का लगावली ?

दादा प्रदेशाध्यक्ष असल्याने ते निवडणुकीला उभे राहिले नव्हते. त्यांना परत पुढे विधानपरिषदेवर घेण्यात आले. तसेच त्यांना मंत्रीमंडळातही घेण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी शंकरराव चव्हाण होते. मंत्री दादा आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यात वारंवार खटके उडू लागले. प्रदेशाध्यक्ष असूनही दादांना शंकराव चव्हाण जुमेनात. ते पक्षासंबंधी निर्णय स्वत घेवू लागले होते. याचा दादांना भयंकर राग यायचा. एकदा दादांच्या केबीनमध्ये हिंदकेसरी मारूती मानेही बसले होते.

राजकीय आखाड्यातील पैलवान

मुख्यमंत्र्यांंचे केबीन गाठले आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या कानफटीत जोरदार लगावली.

दादांनी आपली संपूर्ण कैफियत त्यांच्यासमोर मांडली. हिंदकेसरींना राग अनावर झाला त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांंचे केबीन गाठले आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या कानफटीत जोरदार लगावली. याची चर्चा त्यावेळी संपूर्ण मंत्रालयात लगेच पसरली होती.

अमिताभ बच्चनही हिंदकेसरींवर भाळले होते.

हिंदकेसरी मारूती माने यांना राजीव गांधींनी 1985 मध्ये राज्यसभेवर घेतले होते. त्याकाळात अमिताभ बच्चनही खासदार होते. कधी कधी मारूती मााने आणि अमिताभ बच्चन यांची दिल्लीत भेट व्हायची. अमिताभ बच्चनही हिंदकेसरींवर भाळले होते.

________________________________________________________________________

कुंजीवनमध्ये बालकांवर मौजीबंधन संस्कार
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज