rajkiyalive

ICHALKARANJI CRIME NEWS : हद्दपार संजय तेलनाड काँग्रेस कमिटीत कार्यक्रमात

कोल्हापूर

ICHALKARANJI CRIME NEWS : हद्दपार संजय तेलनाड काँग्रेस कमिटीत कार्यक्रमात : इचलकरंजी शहराबरोबरच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातूनच तडीपार झालेला एस.टी.सरकार टोळीचा प्रमुख संजय तेलनाडे याने शहर काँग्रेस कमिटीत लोकसभा निवडणुकीतील उबाठा चे पराभूत उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याने याची जोरदार चर्चा रंगली असून याबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारला आहे.

ICHALKARANJI CRIME NEWS : हद्दपार संजय तेलनाड काँग्रेस कमिटीत कार्यक्रमात

संजय तेलनाडे यांचेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत.मोका प्रकरणातून तो नुकताच तुरुंगाबाहेर आला आहे यानंतर त्याने नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ सक्रीय सहभाग घेतला होता याबरोबरच त्याच्या इतर कारवायाही वाढू लागल्याने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख पंडीत यांनी संपूर्ण जिल्ह्यातून त्याला तडीपार केले.

त्याच्या काही गुन्ह्यातील खटल्याच्या साक्षीसाठी बुधवारी दि.3 रोजी शहरात आला आणि या संधीचा फायदा घेत बिनधास्तपणे इचलकरंजीत वावरला. दुपारनंतर त्याने काँग्रेस कमिटीत सत्यजित पाटील सरुडकर यांच्या आभारप्रदर्शनाच्या कार्यक्रमातही उपस्थितीलावली. त्यानंतर तो चक्क महापालिकेत तसेच इतर विविध कार्यक्रमात बराच काळ फीरला तो पर्यंत पोलीसांनी याचा थांगपत्ताही लागला नव्हता.यामुळे पोलिसांच्या गुप्त वार्ताविभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या एका प्रमुख पुढार्याच्या इंस्टाग्रामवर कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिस जागे झाले. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली.

एसटी सरकार टोळीवर एका वर्षासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती

त्यानुसार म्होरक्या संजय तेलनाडे यालाही तडीपार बंधनकारक आहे. तथापि त्याला न्यायालयात एका गंभीर गुन्ह्यांतील खटल्यात हजर राहण्यासाठी समन्स प्राप्त झाले होते.त्यानुसार हद्दपारीच्या अनुषंगाने न्यायालयात संबंधित खटल्याची साक्ष देवून नियोजित हद्दपारीच्या ठिकाणी त्वरित जाणे त्याला बंधनकारक असताना तेलनाडे हा काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमात उपस्थित राहीला.

काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमाला सत्यजित पाटील सरूडकरांना निवडणूक प्रचारात मदत केलेल्या महविकास आघाडीतील घटक पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात व्यासपीठावरील पुढार्यांच्या अग्रभागेतील रांगेत उपस्थित होता.त्याने जोरदारपणे राजकीय भाषणही केले.

रात्री महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या इंस्टाग्राम रिल्सवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसारित होत व्हायरल झाला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेलनाडे याने हद्दपार कारवाईच्या अटी व नियमांचा भंग करून कार्यक्रमात प्रवेश केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याची दखल घेत गावभाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याबाबत पुढील कारवाई करण्याचे लेखीपत्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिले आहे.दरम्यान याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवला जाणार आहे. त्यानुसारच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती इचलकरंजी ग्रामिण विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे दिली .

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज