rajkiyalive

Ichalkaranji murdar : मावशीचा मृतदेह पोत्यात गुंडाळून दुधगावमध्ये टाकले

जयसिंगपूर /प्रतिनिधी

Ichalkaranji murdar : मावशीचा मृतदेह पोत्यात गुंडाळून दुधगावमध्ये टाकले: कवठेसार (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत पोत्यात बांधून टाकलेल्या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दोन संशयतांना अटक केली. पैशाच्या लालसे पोटी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दोघासंशतांकडून रोख रक्कम व मोटार सायकल असा 15 लाख 40 हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी हा तपास लावला आहे.

Ichalkaranji murdar : मावशीचा मृतदेह पोत्यात गुंडाळून दुधगावमध्ये टाकले

Ichalkaranji murdar : मावशीचा मृतदेह पोत्यात गुंडाळून दुधगावमध्ये टाकले : दरम्यान खून झालेल्या महिलेचे जरीना बेगम मोहम्मद युसुफ खान (वय 64 रा. नागपाडा, मुंबई. मुळगाव शिवाली राठोड, बागलकोट असे आहे. तर याप्रकरणी तिच्या बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण (वय 37 रा. चंदुर, ता. हातकलंगले) आणि राजू वालाप्पा नायक (वय 36 रा. डीकेटी कॉलेज जवळ, आसरानगर, इचलकरंजी) अशी पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
जुने कवठेसार येथील वारणा नदी पात्राकडेला 21 जून रोजी एका वयस्क महिलेचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह मिळून आला होता.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी जुने कवठेसार येथील वारणा नदी पात्राकडेला 21 जून रोजी एका वयस्क महिलेचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह मिळून आला होता. मृत महिलेच्या हातावर राम-लक्ष्मण जोडी व बाशिंग असे गोंदलेले होते. तर महिलेचा मृतदेह पूर्ण कुजला असल्याने तपासात अडथळा व्यक्त होत होता. पण कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने तपासाला गती देत परिसरातील वृद्ध महिला बेपत्ता अथवा दिसत नाही अशी माहिती घेतली.
खून झालेले जरीना बेगम ही लहानपणापासूनच चंदुर येथे राहावयस होती.
 पोलिसांच्या पथकाला चंदुर रोड आभार फटा येथील नातेवाईकांकडे असलेली महिला गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवत संशयीतांच्या मुसक्या आवळल्या. खून झालेले जरीना बेगम ही लहानपणापासूनच चंदुर येथे राहावयस होती. सुमारे तीस वर्षांपूर्वी प्रेम विवाह करून मुंबई येथे गेली होती. लग्नानंतर जरीना ही तिच्या पतीसोबत मुंबई नागपाडा येथे राहत होती. अडीच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरू केले. तिला मूलबाळ काही नव्हते. यामुळे तिने आपला बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला ही घटना सांगितली.
पतीच्या नावे असलेले घर 28 लाख रुपयाला विकून ती पैशासह चंदुर येथे प्रकाश चव्हाण यांच्याकडे राहावयास आली होती.
 प्रकाशाच्या सांगण्यावरून जरीना हिने मुंबई येथील पतीच्या नावे असलेले घर 28 लाख रुपयाला विकून ती पैशासह चंदुर येथे प्रकाश चव्हाण यांच्याकडे राहावयास आली होती. तिला त्वचारोग होता. गेल्या एक वर्षांपासून ती राहत असलेल्या घरात कोठेही शौचास करून घाण करत होती. तसेच तिच्याकडे पैसे असतील ते आपल्याला मिळतील या हेतूने जरीना हिला प्रकाश चव्हाण याने 11 जून रोजी रात्री चार झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मित्र राजू नायक याला साथीला घेऊन मृतदेह पोत्यात गुंडाळला. यानंतर पल्सर मोटार सायकल घेऊन कुंभोज ते दुधगाव जाणाऱ्या रोडवर असलेल्या वारणा नदीच्या पुलावरून मृतदेह नदीत टाकला.
पोलिसांच्या पथकाने प्रकाश चव्हाण व राजू नायक यांच्याकडे कसून तपास केला. यानंतर जरीना हिच्याकडे शिल्लक राहिलेले 14 लाख 50 हजार रुपये व या घटनेसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल असा 15 लाख 40 हजार रुपयाच्या रोख रकमेसह मुद्देमाल संशयीतांकडून जप्त केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, अतिश म्हेत्रे, प्रकाश पाटील, सतीश जंगम, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, अमित सर्जे, महेश खोत, राजेंद्र कांबळे, रफिक आवळकर, यशवंत कुंभार, आयुब गडकरी, संजय पडवळ, अमोल अवघडे, शिवानंद पाटील, जयदीप बागडे, विक्रम पाटील यांच्या पथकाने केला.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज