rajkiyalive

ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर

dineshkumar aitawade  9850652056

ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. ऑक्टोंबरमध्ये होणार्‍या विधानसभेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आ. प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पक्की असली तरी महाविकास आघाडीसमोर मात्र उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत एकट्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघाने खा. धर्यैशील मानेंना लाखाचे लीड दिले आहे. त्यामुळे महायुती आनंदात असून, महाविकास आघाडी उमेदवारीच्या शेाधात आहे, असेच चित्र आहे.

ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर

मॅचेस्टर सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजी विधानसभा मतदार संघावर आवाडे घराण्याचे पूर्ण वर्चस्व आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कल्लापाण्णा आवाडे आणि त्यांचे पूत्र आ. प्रकाश आवाडे हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दोघांनीही राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. काळाची पावले ओळखून प्रकाश आवाडेंनी भाजपशी सलगी केली आहे. गेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष राहूण हाळवणकरांचा पराभव केला आणि लगेच भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यामुळे धैर्यशील मानेंच्या विजय सोपा झाला. त्यामुळे महायुतीमध्ये आ. प्रकाश आवाडेंची उमेदवारी पक्की आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवारीचा शोध सुरू आहे.

भारताच्या स्वातंत्र्यापासून इचलकरंजी विधानसभा मतदार संघ कायमच काँग्रेसच्या पाठिशी राहिला.

1978़ मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. या निवडणुकीत कल्लापाण्णा आवाडे यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या तिकीटावर ते उभे होते. त्यांना 25 हजार 686 मते मिळाली तर इंदिरा काँग्रेसकडून पारंपरिक विरोधक बाबासाहेब खंजीरे मैदानात होते. त्यांना 22 हजार 169 मते मिळाली. अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली होती.

दोन वर्षानंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लागली. यावेळी अशीच लढाई झाली.

काँग्रेसची उमेदवार कल्लापाण्णा आवाडेंना तर इंदिरा काँग्रेसची उमेदवारी बाबासाहेब खंजीरे यांना मिळाली. पुन्हा एकदा कल्लापाण्णा आवाडे विजयी झाले. पाच वर्षानंतर कल्लापाण्णा आवाडे यांनी राजकारणाची सुत्रे आपले पूत्र प्रकाश आवाडे यांच्याकडे सोपवली. 1885 च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे काँग्रेसकडून उभे राहिले. त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीतर्फे के. एल. मलाबादे उभे राहिले. प्रकाश आवाडेंना 51 हजार 791 तर मलाबादे यांना 32 हजार मते मिळाली. प्रकाश आवाडेंनी पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत पाउल टाकले.

प्रकाश आवाडेंचा धक्कादायक पराभव

आमदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये निवडून आलेल्या प्रकाश आवाडेंना दुसर्‍या निवडणुकीत मात्र पराभव स्वीकारावा लागला. कम्युनिस्ट पार्टीचे के. एल. मलाबादे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. त्यांनी प्रकाश आवाडेंचा पराभव केला. मलाबादे यांना 72 हजार मते मिळाली तर आवाडे यांना 66 हजार मते मिळाली.

1995 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मलाबादे आणि आवाडे असाच सामना झाला.

या निवडणुकीत आवाडेंनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांना 82 हजार मते मिळाली तर मलाबादे यांना 79 हजार मते मिळाली. अडीच हजार मतांनी प्रकाश आवाडेंचा विजय झाला. 1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. इचलकरंजीमध्येही काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेल्या 99 च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी प्रकाश आवाडेंंना तर राष्ट्रवादीची उमेदवारी अशोक जांभळे यांना मिळाली. यावेळी पुन्हा एकदा आवाडेंनी बाजी मारली. त्यांना 64 हजार तर जांभळे यांना 41 हजार मते मिळाली.

2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली. जागावाटपात ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या प्रकाश आवाडेंच्या वाटणीला गेला.

त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शंकर पुजारी उभे होते. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. पुन्हा एकदा आवाडेच आमदार झाले. त्यांना 1 लाख 7 हजार मते मिळाली तर पुजारी यांना केवळ 34 हजार मते मिळाली. सुमारे 73 हजार मतांनी आवाडे निवडून आले.

2009 च्या विधानसभेत पहिल्यांदा भाजपने येथे प्रवेश केला. भाजपकडून सुरेश हाळवणकर यांना उमेदवार मिळाली तर काँग्रेसकडून प्रकाश आवाडे उभे होते. हाळवणकर यांना 90 हजार 104 मते मिळाली तर आवाडे यांना 66 हजार 867 मते मिळाली.अपक्ष उमेदवार अशोक जांभळे यांना केवळ 9 हजार मतावर समाधान मानावे लागले.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले. हाळवणकराां आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली. काँग्रेसकडून प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीकडून मदन कारंडे, शिवसेनेकडून मुरलीधर जाधव उभे राहिले. चौरंगी लढत झाली आणि पुन्हा एकदा हाळवणकर विजयी झाले. त्यांना 94 हजार 214 मते मिळाली तर काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांना 78 हजार 789 मते मिळाली.

गेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुरेश हाळवणकर यांना उमेदवारी मिळाली .

त्यांना 67 हजार 76 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार प्रकाश हाळवणकर यांना 1 लाख 16 हजार 886 मते मिळाली. काँग्रेसने राहूल खंजीरे यांना उमेदवारी दिली होती परंतु त्यांना केवळ 7 हजार मतावर समाधान मानावे लागले.

महाविकास आघाडीमध्ये इचलकरंजीची जागा काँग्रेसच्या वाटणीला आहे. महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना उबाठा गटाचा समावेश झाला आहे. त्यामुळे जागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आवाडे स्वत: की राहूल आवाडेंचे लाँचींग ?

अपवाद वगळता या मतदार संघावर कायमच आवाडे घराण्याची सत्ता आहे. कल्लापाण्णा आवाडेंनी वेळीच राजकारणाची सुत्रे प्रकाश आवाडेंच्या हातात दिली. त्यामुळे प्रकाश आवाडेंना पाच वेळा विधानसभा गाठता आले. लोकसभेसाठी राहूल आवाडेही इच्छुक होते. परंतु त्यांना शांत बसावे लागले. आता त्यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रकाश आवाडे स्वत: उतरणार की राहूल आवाडेंचे लाँचींग होणार हे लवकरच कळेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज