rajkiyalive

निधी पाहिजे असेल तर अजित दादाकडे जावा, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याचा आ. सुमनताईंना अजब सल्ला ;

जनप्रवास तासगाव :
निधी पाहिजे असेल तर अजित दादाकडे जावा, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याचा आ. सुमनताईंना अजब सल्ला ; : मी कोणत्याही पदावर नव्हतो तेंव्हा आर आर आबा पाटील यांनी मला भरपूर मदत केली होती त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, पण तुम्हाला मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी पाहिजे असेल तर अजितदादांकडे जावा. असा अजब सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदार सुमन आर. आर. पाटील यांना दिला आहे.

निधी पाहिजे असेल तर अजित दादाकडे जावा, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याचा आ. सुमनताईंना अजब सल्ला ;

या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि निधीच देणार नसाल तर बैठकीला येऊन कोणत्या कामाचा पाठपुरावा करु असा सवाल आमदार सुमनताई यांनी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे विचारून शुक्रवारी पुणे येथे झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागांतर्गत विभागनिहाय क्षेत्र स्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे येथील विश्रामगृहात एक बैठक घेतली आहे. सदर बैठकीस आपण उपस्थित रहावे असे निमंत्रण सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आमदार सुमनताई यांना लेखी पत्राद्वारे दिले होते.

यानंतर आमदार सुमनताई यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये म्हटले आहे, आपण दिनांक 23 ऑगस्ट 24 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कामांची आढावा बैठक बोलविल्याचे निमंत्रण मला मिळाले आहे. त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.
वास्तविक डिसेंबर 23 मध्ये नागपूर येथे आलेल्या अधिवेशनात खासदार दर्डा यांच्या कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली होती. त्यावेळी आपणास विनंती करून निधी द्यावा असं बोलले. यावेळी आपण स्व.आबांचा उल्लेख करून असे सांगितले की, कोणत्याही पदावर नसताना आबांनी मला भरपूर मदत केलेली होती. त्यामुळे आपण काळजी करू नका.

त्यानंतर चार – पाच दिवसानंतर मी आपणास कामांची यादी घेऊन भेटले, परंतू आपण निधी देण्याबाबत असमर्थ आहोत असे सांगून दादांना भेटा तरच निधी मिळेल असे मला सांगितले. पुन्हा मार्च 24 च्या अधिवेशनामध्ये आपणास भेटून कामांची यादी दिलेली होती. तसेच आर आर आबा यांनी आपणास केलेल्या मदतीची आठवण करून दिली व निधी मागितला. तरीही मला निधी देण्यास टाळाटाळ करुन निधी देण्यास अडचणी आहेत असे सांगितले.

त्यामुळे पुणे येथील बैठकीत कोणत्या कामांचा पाठपुरावा करावा ? असाच प्रश्न मला पडल्याने आपण पाठवलेले निमंत्रण मी अगत्यपूर्वक स्वीकारते, परंतू बैठकीस अनुपस्थित राहते. आपण निमंत्रण दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज