rajkiyalive

ऊस दराचा तोडगा आज निघणार का?

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे घेणार बैठक

जनप्रवास ।  सांगली :

जिल्ह्यात ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही, दहा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय देवू असे कारखानदारांनी स्पष्ट केले होते. परंतु दालमिया आणि क्रांती कारखान्यांनी बिले जमा केली आहेत. उर्वरित कारखान्यांचा निर्णय प्रलंबित असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी चार वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक होईल. आज तरी तोडगा निघणार का? याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

 

ऊस दराचा तोडगा आज निघणार का?

ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 16 डिसेंबरला कारखान्यांचे प्रतिनिधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीत गेल्यावर्षी 3 हजारपेक्षा कमी पैसे दिलेल्या कारखान्यांनी 100 रुपये आणि 3 हजार दिलेल्यांनी 50 रुपये तसेच यावर्षी एफआरपी अधिक 100 रुपये द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी केली होती. मात्र जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस दराचा हा कोल्हापूरचा पॅटर्न धुडकावला होता.

कारखानदार अनुक्रमे 3 हजार 150 आणि 3 हजार 100 रुपयांवर ठाम राहिले

त्यानंतर स्वाभिमानी संघटनेनेे साडेबारा टक्केपेक्षा जादा उतारा असणार्या कारखान्यांनी पहिली उचल 3 हजार 250 आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्यांनी 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी केली. मात्र कारखानदार अनुक्रमे 3 हजार 150 आणि 3 हजार 100 रुपयांवर ठाम राहिले. स्वाभिमानीने दिलेला नवा प्रस्तावही कारखानदारांनी अमान्य केला. त्यामुळे ऊस दरासाठी झालेली बैठक ही निष्फळ ठरली होती. बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने कारखानदारांनी जिल्हाधिकार्यांकडे 26 पर्यंत मुदत मागितली होती.

 

 

 

हेही वाचा

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 

शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

पंधरा कारखान्यांकडे 600 कोटीची ऊसबिले थकित

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

कोंडी फ ोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक

ही मुदत संपली आहे. त्यामुळे दराची कोंडी फ ोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कारखानदार उपस्थित राहणार काय?

ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी 16 डिसेंबरला झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांना जिल्हाधिकारी यांनी निमंत्रण दिले होते. त्यावेळी आ. मानसिंगराव नाईक, शरद लाड, विशाल पाटील वगळता कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे बुधवारी होणार्‍या बैठकीला किती अध्यक्ष उपस्थित राहतील, याबाबतची चर्चा सुरु आहे.


कुंजीवनमध्ये बालकांवर मौजीबंधन संस्कार

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज