islamour bussiness expo news : ‘इस्लामपूर बिझनेस एक्स्पो’च्या मंडप उभारणीचा शुभारंभ : इस्लामपूर व परिसरातील छोटे-मोठे उद्योग व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवार दि.१८ ते शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित ‘इस्लामपूर बिझनेस एक्स्पो २०२५’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील आ.जयंतराव पाटील खुल्या नाट्य गृहाच्या भव्य मैदानात ‘इस्लामपूर बिझनेस एक्स्पो’च्या मंडप उभारणीचा शुभारंभ इस्लामपूर बिझनेस फोरमचे अध्यक्ष विकास राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.
islamour bussiness expo news : ‘इस्लामपूर बिझनेस एक्स्पो’च्या मंडप उभारणीचा शुभारंभ
“या एक्स्पोचा स्थानिक व्यावसायिक,उद्योजकांना मोठा फायदा व्हावा,या ४ दिवसात साधारण २५ हजार नागरिकांनी एक्स्पोला भेट द्यावी आणि १० कोटींच्यावर उलाढाल व्हावी,असे आम्ही नियोजन केले असल्याचा विश्वास आयबीएफचे अध्यक्ष विकास राजमाने यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आयबीएफचे मार्गदर्शक,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दुसऱ्या एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. १०४ व्यापारी,व्यावसायिक स्टॉल आहेत आणि १५ फूड स्टॉल आहेत. या एक्स्पोमध्ये आयबीएफ व नेत्रा आरआयटी इन्क्युबेटरमार्फत नव उद्योजकांना आर्थिक, मार्गदर्शनासह लागेल ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्याना दीड लाखपर्यंतची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांसाठी ही पर्वणी असणार आहे. शहर व परिसरातील व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष प्रवीण फल्ले,नवाज पटवेकर,आरिफ तांबोळी,प्रीतम सांभारे, विशाल सूर्यवंशी,अनिकेत टिळे,संग्रामसिंह जाधव,प्रतिभा पाटील,प्रशांत जाधव,अमर डुबल,निरंजन देवकर,नितीन फल्ले,रोहन शिंगण,संदेश खोत,तसेच अमरदीप पाटील (कोल्हापूर) उपस्थित होते. कोअर कमिटी सदस्य प्रवीण पाटील,राजू देसाई,शहाजी पाटील,धीरज भोसले,महेश ओसवाल,स्वरूप साळुंखे,वैभव पाटील,मोहन जाधव,जयदीप पाटील,भगतसिंह पाटील,सुप्रिया पेटकर, पुष्पलता खरात,संग्राम पाटील यांनी संयोजन केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



