rajkiyalive

islampur crime news : इस्लामपूरात जादूटोणा, करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

islampur crime news : इस्लामपूरात जादूटोणा, करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस : इस्लामपूर-ऊरुण परिसरातील एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबीय व लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्यात तयार झालेली भिती दूर केली.

islampur crime news : इस्लामपूरात जादूटोणा, करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

अंनिसच्या पदाधिकार्‍यांनी साहित्य केले बाजूला ः नागरिकांची प्रबोधनाने भिती दूर

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उरूण परिसरातील धनगर गल्ली येथे एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दारातच जादूटोणा, करणीचे साहित्य ठेवल्याची घटना समोर आली. त्यांच्या दरवाजाच्या बाहेर बकर्‍याचे मुंडके, चार पाय रंगीत दोरीने लटकवले होते. त्यावर लिंबू, सुया, पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोर्‍याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. 21 लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही पिना टोचलेले समोर ठेवले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेले फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी कुंकू गुलाल टाकला होता. परिसरातील सर्वसामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते.

हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलीस आले. संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगत त्यांचे प्रबोधन केले. सर्व साहित्य संजय बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांकडे केली आहे.

islampur-crime-news-a-shocking-case-of-witchcraft-revealed-in-islampur

अंधश्रद्धेचा प्रसार करणार्‍यांवर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हे

अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही. आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत. त्यामुळे अशा अघोरी, अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. करणी, जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार-प्रसार करणार्‍यांवर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा अंनिसचे संजय बनसोडे यांनी दिला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज