islampur crime news : टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार: इस्लामपूर-कामेरी मार्गावर दुचाकीला ओव्हरटेक करताना टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार गणेश नंदकुमार पाटील (वय 28, रा.भुयेवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अपघाताचा प्रकार घडला.
islampur crime news : टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
इस्लामपूर-कामेरी मार्गावर अपघात ः मृत युवक करवीरचा
अपघाता नंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी चालकाविरोधात इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश पाटील कुटुंबियासह भुयेवाडी, कोल्हापूर येथे राहणेस होता. जना स्मॉल फायनान्स बँक शाखा सी.बी. एस स्टैंड कोल्हापुर येथे नोकरीस होता. मंगळवार दि. 18फेब्रुवारी रोजी सकाळी 7 च्या सुमारास गणेश वाठार, कोडोली, पेठनाका, कामेरी असे कलेक्शन करुन दुपारी 2.30 च्या सुमारास एसटी स्टँड इस्लामपुर येथे आला.
दोघेही आपापल्या दुचाकीवरुन इस्लामपुर येथुन कोल्हापुरला जाण्यासाठी कामेरी रोडने निघाले
त्यावेळी गणेशला चुलतभाऊ बाबासो पाटील भेटला. दोघेही आपापल्या दुचाकीवरुन इस्लामपुर येथुन कोल्हापुरला जाण्यासाठी कामेरी रोडने निघाले. गणेश दुचाकी क्र. चक 09 उए 2216 वरुन निघाला. कामेरी रोडने पुढे चाललो होते. दुपारी 3 च्या सुमारास पाठीमागुन ट्रॅक्टरचा हॉर्नचा आवाज आल्याने गणेशने त्याची दुचाकी पुढे घेतली. ट्रॅक्टर पाठीमागुन ओव्हरटेक करुन पुढे जाताना गणेशच्या दुचाकीला ट्रॅक्टरच्या मागे जोडलेली ऊसाने भरलेली ट्रॉली घासल्याने तो रोडवर पडला.
त्याच्या डोक्यावरुन ऊसाने भरलेल्या मागील ट्रॉलीचे चाक गेल्याने गणेशच्या डोक्याचा चेंदामेंदा होवुन तो जागीच मयत झाला.
त्यानंतर बाबासोसह नागरिकांनी आरडोओरडा केल्यानंतर काही अंतरावर टॅ्रक्टर जावुन थांबला. ट्रॅक्टरवरील चालकाने ट्रॅक्टर तेथेच थांबवुन पळ काढला. ट्रॅक्टरजवळ जावुन पाहिले असता ट्रॅक्टरचा नंबर दिसुन आला नाही. हयगईने, भरधाव वेगाने टॅ्रक्टर चालवुन रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करत गणेश पाटील याच्या अपघाती मृत्यूस कारणीभुत झाला. याबाबतची फिर्याद बाबासो शिवाजी पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस करित आहेत.
अपघातात मृत्यू झालेला गणेश पाटील हा होतकरू युवक होता. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी तो पेलत होता. घरातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



