rajkiyalive

islampur news : वाळवा तालुक्यात सवाधिक 630‘बंदूक’ परवानेधारक

islampur news : वाळवा तालुक्यात सवाधिक 630‘बंदूक’ परवानेधारक  देशात परवान्याशिवाय बंदूक वापरणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीने विनापरवाना शस्त्र बाळगले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. यामुळे देशात कोणीही विनापरवाना शस्त्र बाळगू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांनी ‘आत्मसंरक्षणा’च्या नावाखाली बंदुकीचा परवाना काढला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ही संख्या 2 हजार 548 इतकी आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील बंदूकधार्‍यांची संख्या तब्बल 630 इतकी आहे.

islampur news : वाळवा तालुक्यात सवाधिक 630‘बंदूक’ परवानेधारक

आत्मसंरक्षणासाठी बंदूक वापरण्याची ‘क्रेझ’ ः 112 परवाने रद्द

या पोठोपाठ शिराळा, मिरज आणि तासगाव आणि सांगली शहरांमध्ये परवानाधारक बंदूकधारक आहेत. आत्मसंरक्षणाच्या नावाखाली बंदूक वापरण्याची नवी ‘क्रेझ’ जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान विविध कारणांनी आतापर्यंत 112 परवाने रद्द करण्यात आले आहेत तर अजून 50 प्रस्तावांची पडताळणी सुरु आहे.

खांद्याला बंदूक अडकवून रपेट मारण्याचा एकेकाळी अनेकांचा शौक होता.

बंदूक म्हणजे प्रतिष्ठा असे कधीकाळी समीकरण होते. आता पुन्हा एकदा बंदुकीला ‘ग्लॅमर’ आल्याने प्रशासनाकडे अर्जांचा पाऊस पडत आहे. आत्मसंरक्षण शस्त्रपरवाना हवा या कारणास्तव अर्ज केले जातात. काळ बदलला असला तरी बंदुकीचे आकर्षण कायम आहे. काहींना बंदूक असणं अजूनही प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. यासाठी ही मंडळी रायपॐल, पिस्टल किंवा रिव्हॉल्हवरसाठी अर्ज करतात. बहुतांश अर्ज नाकारले जात असतानाही अर्जदारांची संख्या मात्र सतत वाढणारी आहे.

शस्त्र परवाना हा संरक्षण, स्पोर्टस आणि शेती संरक्षण या कारणांसाठी दिला जातो.

स्पोर्टससाठी परवाना खातरजमा करुन दिला जातो. यासाठी अर्ज करणार्‍यांची संख्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा वावर असतो अशा शिराळासह डोंगराळ भागातील अर्जदारांची पुर्ण चौकशी आणि कागदपत्रांची खातरजमा करुन शेतीसंरक्षाणासाठी परवाना दिला जातो. स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणार्‍यांची पार्श्वभूमी पाहिली जाते. त्यांना कुणाकडून जीवितास धोका आहे याबद्दलची पुर्ण चौकशी पोलिसांकडून केली जाते.

सांगली जिल्हयात परवानाधारक बंदूकधार्‍यांची संख्या जवळपास 2 हजार 548 इतकी आहे.

मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर अवैध शस्त्रांचा मुद्दा चव्हाट्यावर आला. पोलिसांच्या तपासणीमध्ये जवळपास 127 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. सांगली जिल्ह्यात या अनुशंगाने कोणतेही अनुचित घटना घडणार नाही याची पुरेपूर काळजी जिल्हा प्रशासन, पोलिसांनी घेतली आहे. अडीच हजारांपैकी जवळपास 112 बंदूक परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये काही मयत परवानाधारकांचाही समावेश आहे. तर आणखी 50 जणांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यांची कसून पडताळणी सुरु आहे.

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यांमध्ये सर्वाधिक 630 बंदूकधारी आहेत.

केवळ इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच 330 बंदूकधारी आहेत. वाळवा तालुक्यातील बंदूकधार्‍यांची ही संख्या चक्रावून सोडणारी आहे. याबाबत प्रशासनानेही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. खरोखरच परवान्याची गरज आहे का याची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान वाळवा तालुक्यापाठोपाठ शिराळा, मिरज, सांगली आणि तासगाव तालुक्यांतील बंदकधार्‍यांचा क्रमांक लागतो. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम राबवत या परवान्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे.

कसा काढायचा परवाना?

शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला जातो. या ठिकाणी असणार्‍या शस्त्र परवाना विभागात विहीत नमुन्यातील अर्ज मिळतो. तो अर्ज पुर्ण भरुन या विभागाकडे दिला जातो. हा अर्ज पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेकडे पाठवला जातो. यानंतर अर्जदाराच्या हद्दीतील पोलिस स्टेशनकडे हा अर्ज चौकशीसाठी वर्ग केला जातो. या चौकशीनंतर हा अहवाल डीवायएसपी कार्यालयाकडे पाठवण्यात येतो. या कार्यालयाकडून पुन्हा फेरचौकशी केली जाते.

डीवाएसपी अर्जावर ठळक सूचना लिहून अर्ज पोलिस अधीक्षकांकडे पाठवतात. या संपूर्ण प्रक्रियेत अर्जावर सकारात्मक रिमार्क असेल तर पोलिस अधीक्षक सबंधित अर्जदाराला बोलवून त्याची मुलाखत घेतात. यानंतर हा अर्ज रिमार्कसह जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला जातो. रिमार्क सकारात्मक असेल तर अर्जदाराला पासपोर्टसाठी लागत असलेल्या कागदपत्रांसारखी सर्व कागदपत्रे पोलिस स्टेशनकडे सादर करावी लागतात. यासह कुटुंबियांचे विशेषत: पत्नीचे शपथपत्र जोडावे लागते. सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सबंधित अर्जदाराची शारिरीक व मानसिक तपासणी केली जाते. अर्जदाराला कागदपत्रांसोबत बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रशस्तीपत्रक जोडावे लागते.

आष्टा 130
कासेगाव 70
कुरळप 100
इस्लामपूर 330
आटपाडी 44
चिंचणी-वांगी 16
जत 143
कवठेमहांकाळ 173
कडेगांव 42
तासगाव 279
कोकरुड 77
कुंडल 26
कुपवाड एमआयडीसी 17
महात्मा गांधी (मिरज) 35
मिरज शहर 93
मिरज ग्रामीण 119
पलूस 89
सांगली शहर 203
सांगली ग्रामीण 94
संजयनगर 82
शिराळा 239
उमदी 60
विश्रामबाग (सांगली) 237
विटा 109

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज