islampur news : पेठमधील कलाशिक्षकाने कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र : राज्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठ ता.वाळवा, जि.सांगली मधील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी चक्क कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे.
islampur news : पेठमधील कलाशिक्षकाने कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र
अरविंद कोळी यांची छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
शिवरायांचं चित्र साकारण्यासाठी त्यांनी क्रेलिक रंगांचा वापर केला. विशेष म्हणजे हे चित्र रेखाटण्यास त्यांना 5 मिनिटे वेळ लागला. भिंगाचा वापर न करता 1 सेमी बाय 1.5 सेमी आकाराचे हे सूक्ष्म चित्र त्यांनी साकारले आहे. कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कवड्यांची माळ परिधान करत होते. हीच प्रेरणा घेऊन अरविंद कोळी यांनी कवडीवर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे.
यापूर्वी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने त्यांनी छत्रपती शिवरायांची नऊ दुर्मिळ चित्रे प्रथमच रेखाटली होती. त्याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



