islampur news : आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने रविवार 22 रोजी हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम : इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने रविवार दि.22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हिंदी- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा युवा पार्श्व गायक ’’नचिकेत लेले लाईव्ह ईन कॉन्सर्ट’ विथ अक्षता सावंत हा हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात होत आहे.
islampur news : आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने रविवार 22 रोजी हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कारने 22 संगीत महोत्सवाचे प्रभावीपणे आयोजन केले आहे. आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 18 व 19फेब्रुवारी 2024 रोजी 22 वा संगीत महोत्सव उत्साहात पार पडला आहे. आज रविवारी होणारा कार्यक्रम हा 22 व्या संगीत महोत्सवातील शेवटचा कार्यक्रम आहे. नचिकेत लेले हा गुणी युवा पार्श्व गायक असून त्याने कमी कालावधीमध्ये देश व परदेशात 50 च्यावर कार्यक्रम सादर केले आहेत.
अक्षता सावंत युवा मराठी पार्श्व गायिका आहेत. या कार्यक्रमाचा आनंद कलारसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आविष्कारचे मोहन चव्हाण, अध्यक्ष सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील, उपाध्यक्ष भूषण शहा, सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड, खजिनदार राजेंद्र माळी, माजी अध्यक्ष सतिश पाटील, प्रा.कृष्णा मंडले, सौरभ सावंत, विश्वास कदम, विनायक यादव, हर्षवर्धन घोरपडे, श्रेयस पाटील, प्रताप कवठेकर, हर्षवर्धन मोहिते यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



