rajkiyalive

islampur news : इस्लामपुरात बुधवारी शिवस्वराज्य यात्रेची भव्य सांगता

इस्लामपूर 
islampur news : इस्लामपुरात बुधवारी शिवस्वराज्य यात्रेची भव्य सांगता : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली,खा.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकांच्या प्रचंड प्रतिसादात महाराष्ट्राचा झंजावती दौरा पूर्ण करीत असलेल्या शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा बुधवार दि.16 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 5 वाजता इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील, खा.अमोल कोल्हे,तसेच पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. ही सांगता सभा म्हणजेच पक्षाच्या राज्यातील प्रचाराचा शुभारंभ सभा असणारा आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी दिली.

islampur news : इस्लामपुरात बुधवारी शिवस्वराज्य यात्रेची भव्य सांगता

देवराज पाटील म्हणाले,ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि.9 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन करून शिव स्वराज्य यात्रेचा प्रवास सुरु झाला. या यात्रेचा 19 जिल्ह्यातील 67 मतदारसंघाचा 7 हजार 365 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होत आहे. आ जयंतराव पाटील,खा.कोल्हे यांनी या यात्रेतील भाषणात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्यावर बोट ठेवत महागाई, शेती मालाचा भाव,बेरोजगारी,महिलांच्या वरील वाढते अत्याचार आदी मुद्द्यांवर प्रहार चढविला आहे. लोकांचा या यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. इस्लामपूर येथे या यात्रेची सांगता करताना आम्ही सांगली जिल्हा व वाळवा तालुक्याच्या वतीने हल्लाबोल आणि परिवार संवाद यात्रेपेक्षाही सांगता सभा जोरदार करणार आहोत.

विजयराव पाटील म्हणाले,इस्लामपूर येथील मा.जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात यात्रेच्या सांगता सभेची जय्यत तयारी केली जात आहे. ही यात्रा वाई (जि.सातारा) वरून येणार आहे. प्रथम विविध मुद्द्यांवर प्रबोधन पर पथनाट्य होईल. या सभेस येणार्‍या कार्यकर्त्यांची वाहने उभा करण्याची व्यवस्था विद्यामंदिर हायस्कुल व इस्लामपूर हायस्कुल च्या मैदानात केलेली आहे. इस्लामपूर,आष्टा या शहरांच्यासह वाळवा तालुका,तसेच मिरज तालुक्यातील 8 गावातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

अँड.चिमणभाऊ डांगे,वैभव शिंदे,शहाजी पाटील,खंडेराव जाधव,अँड.धैर्यशिल पाटील, पै.भगवान पाटील,सुरेंद्रदादा पाटील,विश्वनाथ डांगे,पुष्पलता खरात,बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,पुष्पलता खरात,दिलीपराव वग्याणी,विराज शिंदे,संग्राम फडतरे,संग्राम जाधव,देवराज देशमुख,शिवाजी चोरमुले, तेजश्री बोंडे,मिरज तालुक्यातील आनंदराव नलवडे,वैभव पाटील,भास्कर पाटील,सचिन पाटील,प्रमोद आवटी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गावोगावचे कार्यकर्ते ही सभा अभूतपूर्व करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज