rajkiyalive

islampur vidhansabha : आ.जयंत पाटील आष्टावधानी आमदार

islampur vidhansabha : आ.जयंत पाटील आष्टावधानी आमदार : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 1 लाख 9 हजार 879 तर निशिकांत पाटलांना 96 हजार 852 इतकी मते मिळाली. निशिकांत पाटील यांच्यावर 13 हजार 27 मतांनी विजय मिळवला. आ.जयंत पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली.

islampur vidhansabha : आ.जयंत पाटील आष्टावधानी आमदार

इस्लामपुरातील शासकीय गोदामात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. 21 फेर्‍यांमध्ये मतमोजणी झाली. आ.जयंत पाटील यांनी पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली. आ.जयंत पाटील यांना 1831 तर निशिकांत पाटील यांना 715 पोस्टल मते मिळाली. आ.जयंत पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु त्यांची आघाडी तीन अंकी संख्ये पुढे गेली नाही. इस्लामपूर शहरात मात्र जयंत पाटील यांना चार फेर्‍यांमध्ये मोठी आघाडी मिळाली. ही आघाडी 21 फेर्‍यांपर्यंत अबाधित राहिली.

आ.जयंत पाटील यांनी 16 फेर्‍यात तर 5 फेर्‍यात निशिकांत पाटील यांनी मताधिक्य मिळवले. आ.जयंत पाटीलांना गतवेळी मिळालेले 73 हजारांचे मताधिक्य मात्र मोठ्या प्रमाणात घटून 13 हजारांवर आले. आ.जयंत पाटील यांच्या विजयानंतर राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला. युवक व महिला पदाधिकार्‍यांनी आ.जयंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिशबाजी केली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांना मिळालेली मते :- जयंत राजाराम पाटील – 1,09,879, निशिकांत भोसले पाटील – 96,852,अमोल विलास कांबळे – 704, राजेश शिवाजी गायगवाळे – 994, सतीश शिवाजी इदाते – 194,अमोल आनंदराव पाटील – 113, किरण संपतराव पाटील – 803, गुणवंत रामचंद्र देशमुख – 439, जयंत राजाराम पाटील – 491, जयंत रामचंद्र पाटील -121, निशिकांत दिलीप पाटील – 462, निशिकांत प्रल्हाद पाटील – 344 अशी आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज