islampur vidhansabha news : इस्लामपूरात 14 टेबलवर 21 फेर्यात होणार मतमोजणी : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीने 74.51 इतके मतदान झाले. गत निवडणुकीपेक्षा यंदा मात्र मतदानाचा टक्का वाढल्याने टक्का कोणाला फायदा व कोणाला तोटा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी इस्लामपूर येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. 14 टेबलवर 21 फेर्या होणार आहेत.
islampur vidhansabha news : इस्लामपूरात 14 टेबलवर 21 फेर्यात होणार मतमोजणी
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 80 हजार 856 मतदारापैकी 2 लाख 9 हजार 839 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 1 लाख 41 हजार 698 पुरुष मतदारापैकी 1 लाख 8 हजार 92 तर 1 लाख 39 हजार 152 स्त्री मतदारांपैकी 1 लाख 1 हजार 743 मतदारांनी हक्क बजावला. इस्लामपूर मतदारसंघात तब्बल 12 उमेदवार निवडणुकीसाठी नशीब आजमावत आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे आ.जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्यात काटा लढत झाल्याचे दिसून आले. 35 वर्षातील विकास, सहकार, उसदर, एमआयडीसी, रोजगार या मुद्द्यावर निवडणूक चांगलीच गाजली. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्या झडल्या. त्यामुळे निवडणूक प्रचारात रंग भरला होता. त्यामुळे मतदारसंघांमध्ये निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.
दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा
इस्लामपूर मतदारसंघात आ.जयंत पाटील 50 ते 60 हजार मताधिक्क्यांनी विजयी होतील असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. तर निशिकांत पाटील 10 ते 15 हजार मतांनी विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. कोणाचा दावा खरा ठरतो हे दोन दिवसांनतर समजणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



