jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या जैन नेक्स्ट अॅपचे लाँचिंग : दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने समाजातील व्यापारी, उद्योजकांसाठी तयार करण्यात आलेल्या जैन नेक्स्ट या अॅपचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या अॅपच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील छोट्या मोठ्या व्यापार्यांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या जैन नेक्स्ट अॅपचे लाँचिंग
सांगली धामणी रस्त्यावरील ऐश्वर्या हॉलमध्ये जैन समाजातील व्यापार्यांचा मेळावा आयोजित करण्यता आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. राहूल आवाडे, उद्योजक अभिनंदन पाटील, चंदूकाका सराफचे अतुलभाई शहा-सराफ, किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, शीतल दोशी, गणेश बेकरीचे अण्णासाहेब चकोते आदी उपस्थित होते.
उद्योजकांनी इंडस्ट्रीयल पार्क उभारावे – राजेंद्र पाटील यड्रावकर
जैन समाज हा 35 टक्के टॅक्स भरणारा समाज आहे. समाजातील उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव उद्योजकांना उभारी देण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी जैन समाजातील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन इंडस्ट्रीयल पार्कची उभारणी करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, उद्योग व व्यापार क्षेत्रात भरारी घेण्याची धडपड करणार्या तरुणांना बळ देण्याची, त्यांच्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करुन देण्याची भूमिका जैन समाज पार पाडत आहे. आपली मुले नोकरीच्या मागे न लागता ती उद्योग, व्यापारात आली पाहिजे. यावेळी जैन समाजातील उद्योजकांनी एकत्र येऊ इंडस्ट्रीयल पार्क उभा करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भालचंद्र पाटील म्हणाले, जैन सभा आरोग्य, संस्कार, शेती, उद्योग आणि शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित काम करत आहे. यावेळी रावसाहेब पाटील, भाऊसाहेब नाईक, डॉ. अजित पाटील, उद्योजक शीतल थोटे, प्रा. एन. डी. पाटील आदींसह उद्योजक, महिला उपस्थित होत्या.
जैन नेक्स्ट बिझनेस अॅप
जैन नेक्स्ट बिझनेस पद्वारे समाजातील नवउद्योजकांना उभारणी दिली जाणार आहे. तर बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एखाद्याला उद्योग उभारयचा असेल तर इतर उद्योजक त्याला मार्गदर्शन करतील, तर बेरोजगार तरुणाला एखादा उद्योजक त्या युवकांच्या कौशल्याच्या आधारे त्याला नोकरी उपलब्ध करून देईल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



