jain samaj news : भ. महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगलीत भव्य शोभायात्रा : भगवान महावीर यांच्या 2624 व्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरातील जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी, इ. सर्व पंथीयांच्यावतीने सन 1939 पासुन सुरु असलेली एकत्रीत भव्य मिरवणूक गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता आमराई जवळील सुनितीन जैन भवन येथून निघणार आहे.
jain samaj news : भ. महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगलीत भव्य शोभायात्रा
सांगलीत निघणार्या या भव्य शोभा यात्रेच्या माध्यमातून भ. महावीरांचा शांती संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संप्पन्न होणार आहे. या भव्य शोभा यात्रेत रथ, चांदीचे रथ आकर्षक सजावटीनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, पंचमेरु, समाजप्रबोधनात्मक देखावे याचा समावेश असणार आहे. ही मिरवणुक श्री. सुनितीन जैन भवन पासून सुरु होऊन हायस्कुल रोड गणपतीपेठ टिळक स्मारकमंदिर हरभट रोड कापडपेठ रोड राजवाडा चौक रॉकेल लाईन श्रीमती कळंत्रेआक्का जैन महिलाश्रम या मार्गाने जाऊन भ. आदिनाथ जिनमंदिर महावीरनगर सांगली येथे विसर्जित होईल.
भ. महावीर जन्मकल्याणकनिमित्त गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी कच्छी जैन भवन येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच सिव्हील हॉस्पीटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांडहोम येथे अन्नदान व फळवाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे यादिवशी सर्व कत्तलखाने, मांसविक्री, दुकाने बंद ठेवणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
jain-samaj-news-bh-grand-procession-in-sangli-on-the-occasion-of-mahavir-janma-kalyan-mahotsav
सांगलीत निघणार्या या भव्य मिरवणुकीत सर्व जैनधर्मिय स्त्री पुरुष, युवकयुवती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेठ रा.ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन मा. प्रा. राहूल महावीर चौगुले व जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. सुभाष शाह यांनी केले आहे. या भव्य मिरवणुकीत शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली, श्री 1008 भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथनगर, सांगली, श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, गावभाग, सांगली, श्री 1008 भगवान शांतिनाथ दिगंबर जिनमंदिर, दत्तनगर, सांगली, श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर, पार्श्वनाथनगर, सांगली, श्री 1008 पार्श्व पदमावती मंदिर, पदमावती कॉलनी धामणी रोड, सांगली, श्रीमती कळंत्रे आक्का जैन श्राविकाश्रम, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री.महावीर स्वामी जैन श्वेतांबर जैन मुर्तीपूजक संघ, सांगली श्री, अमिझरा पार्श्वनाथ देहारासर ट्रस्ट,श्री. शत्रुंजय आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, जैन श्वेतांबर स्थानकवासी संघ, कच्छी जैन श्वेतांबर संघ, या मित्र संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत.
सदर पत्रकार परिषदेस जैन बोर्डींग सांगलीचे सेक्रेटरी अॅड. मदन पाटील, सुपरिटेंडेंट राजेश पाटील, जैन श्वेतांबर देहरासर मंदिरचे, जतिन शहा, रोहन मेहता, महावीर भन्साली, श्रीमती कळंत्रेआक्का जैन महिलाश्रमचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील, सेक्रेटरी श्रीमती छाया कुंभोजकर, सुनिता चौगुले, विना आरवाडे, सुरेखा मुंजाप्पा, मंगल चव्हान, संध्या पाटील, विजया कर्वे, इ. उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.