jain samaj news : जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार – ललित गांधी: जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक सुरक्षितता व गरजु लोकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ‘जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ’ चे कामकाज गतीमान व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित होणार असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
jain samaj news : जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार – ललित गांधी
जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असुन महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू होऊन समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तिपर्यंत याचे लाभ पोहोचले पाहीजेत अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामंडळाचा अहवाल सादर करून आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेण्यास मान्यता देवुन तशा सुचना अधिकार्यांना दिल्या.
सदर बैठकीस अल्पसंख्यक कार्य मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यक कार्य राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव – सामान्य प्रशासन विभाग, प्रधान सचिव – वित्त, प्रधान सचिव – नियोजन, सचिव – अल्पसंख्यक कार्य विभाग, सहसचिव – अल्पसंख्यक कार्य विभाग, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी ललित गांधी यांनी अल्पसंख्यक विभागाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी सहसचिव मो.बा.ताशिलदार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदूम यांचे समवेत बैठक घेवुन पहिल्या 100 दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासंबंधी चर्चा करून अधिकार्यांना मार्गदर्शन केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



