rajkiyalive

jain samaj news : मंदिरावरील अतिक्रमणाविरोधात दिगंबर जैन समाजाचा मोर्चा

जनप्रवास । सांगली
jain samaj news : मंदिरावरील अतिक्रमणाविरोधात दिगंबर जैन समाजाचा मोर्चा : राज्यातील दिगंबर जैन मंदिरांवर गुजराती श्वेतांबर जैन समाजाकडून अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. या दडपशाहीचा निषेध करीत सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जैन मंदिराचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

jain samaj news : मंदिरावरील अतिक्रमणाविरोधात दिगंबर जैन समाजाचा मोर्चा

सकल जैन समाजाच्यावतीने बालब्रम्हचारी तात्या नेजकर यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अतिक्रमण करणार्‍यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात 43 मुर्ती आहेत. त्यातील एका मूर्तीचा वाद केवळ न्यायालयात आहे. त्याचा फायदा घेत त्यांना तेथे अतिक्रमण सुरु केले आहे. इतर मूर्तींचा विषय नसताना त्या मूर्तींना वस्त्र व अलंकार घातले जात आहे. या विरोध केल्यानंतर दिगंबर जैन समाजातील लोकांवर दमदाटी केली जात आहे. याविरोधात पोलिसात तक्रार केली तर पोलीस तक्रार घेत नाहीत. उलट आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दबावाखाली प्रशासनाकडून त्याला संरक्षण मिळत आहे. ही मंडळी भाजपच्या सत्तेचा गैरफायदा घेऊन दिगंबर जैन समाजाची गळचेपी करत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. हे लोण आता राज्यभर चालत आहे. पैठण, मांगीतुंगी, भादुकली, मुक्तागिरी, यलोरा, चिंतूरपर्यंत वाढताना दिसत आहे.

आता दिगंबर जैन साहित्यावर गुजराती अतिक्रमण सुरु झाले आहे. राज्य शासनाच्या विविध समित्यांवर श्वेतांबरांची भरती अधिक आहे. जिल्हाधिकारी नियुक्त समित्यांवर त्यांचा टक्का अधिक आहे. दिगंबर जैन समाज शेती करतो, कष्ट करतो, या समाजात गरिब घटकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे समाजाचे संरक्षण करावे.

असामाजिक तत्वांकडून बालब्रम्हचारी तात्याभैय्या नेजकर यांच्या जिवीतास धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना शासनाच्यावतीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली. या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या मोर्चात भालचंद्र पाटील, सुहास पाटील, शांतिनाथ पाटील, उदय पाटील, रविंद्र पाटील, राजेश पाटील, शितल पाटील, बाहुबली गणे, किरण इंगळे, संदिप पाटील, राजेंद्र आगरे, उदय देवर्षी, विजय निरवाणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज