jain samaj news : आचार्य शांतीसागर महाराजांना भारतरत्न द्या : राजू शेट्टी : जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ साधू चरित्र चक्रवर्ती प्रथम आचार्य 108 श्री शांतीसागर महाराजांना भारत सरकारने सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात यावा. या पुरस्काराने देशभरातील जैन समाजाला प्रेरणा मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी नांदणी पंचकल्याण महोत्सवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली.
jain samaj news : आचार्य शांतीसागर महाराजांना भारतरत्न द्या : राजू शेट्टी
त्याबरोबरच नांदणी येथील अतिशय तिर्थक्षेत्रास अ वर्गाचा दर्जा देण्याची मागणी देखील करण्यात आली. या मठांच्या अधिपत्याखालील 740 गावांचा जैन समाजातील पुरातन मठ आहे. नांदणी मठाचा इतिहास हा इ. स. 857 पेक्षा पूर्वीचा असून, उपलब्ध कागदपत्रांवरून नांदणी मठाची उत्पत्ती 701 पासूनची आहे. या पीठाचे पहिले आचार्य श्री. जिनसेन महाराज हे होते. या मठाचे मठाधिपती म्हणजे भट्टारक महाराज हे त्या मठाचे राजे आहेत.

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय लाईव्ह या व्हॉटसअॅप चॅनलला फॉलो करा, येथे क्लिक करा
वरील सर्व गावांचा कारभार या मठातून चालत असल्याने या तिर्थक्षेत्रास अ वर्गाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. मा. खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या वरील दोन्ही मागणीबाबत राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मकता दर्शवित लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे धर्मसभेस संबोधित करताना बोलले.
परमपुज्य आचार्य 108 विशुध्दसागर महाराज ससंघ, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आम. प्रकाश आवाडे, आम. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आम. राहूल आवाडे, आम. सुरेश खाडे, आम. अमल महाडिक, आम. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सागर शंभुशेटे यांचेसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



