jain samaj news : वाळव्यात महावीर होरे यांना पंचकल्याण पुजेच्या यजमानपदाचा मान : वाळव्यातील कोटभाग येथे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर नूतन शिखर,वेदी जीनबिंबपंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य धर्मसागर महाराज आणि आगमचक्रवर्ती 108 प. पू. विद्यासागरजी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नुकताच या कार्यक्रमांचे सवाल काढण्यात आले.
jain samaj news : वाळव्यात महावीर होरे यांना पंचकल्याण पुजेच्या यजमानपदाचा मान
महामहोत्सवातील सौधर्म इंद्र, इंद्रायणी होण्याचा मान वाळवा येथील धर्मानुरागी महावीर बबन होरे व डॉ.सौ. वंदना महावीर होरे यांना मिळाला. यावेळी पंचकल्याण पूजेसाठी अन्य सवालही घेण्यात आले. तीर्थंकर माता-पिता- सौ व श्री राजेंद्र विद्याधर मगदूम, धनकुबेर- सौवश्री महावीर नाभीराज होरे, ईशान्य इंद्र इंद्रायणी – सौ व श्री प्रकाश देवाप्पा होरे , चक्रवर्ती – सौ व श्री विनय अजित होरे, महायज्ञ नायक – सौ व श्री सतीश पारिसा होरे, सुवर्ण सौभाग्यवती- प्रियंका प्रकाश मगदूम , अखंड दिपस्थापन – प्रविण राजोबा, ध्वजारोहण – प्रदिप मगदूम, मंडप उद्घाटक -संजय कुमार होरे, जलकुंभ पहिला दिवस – सौ.व श्री प्रकाश मगदूम , मंगलकलश- उत्कर्ष होरे
तसेच नेहा होरे, सानिका मगदूम , समीक्षा मगदूम, आदिश्री मगदूम, स्वरा मगदूम, वीरश्री आवटी, अर्जवी होरे , सन्मती होरे आदिंना अष्टकुमारीका सवाल मिळाले.
या पंचकल्याण महोत्सवासाठी किशोर मगदूम, संजय होरे, वर्धमान मगदूम, वीरधवल होरे, यशपाल होरे, महावीर होरे, राहुल मगदूम, सुनील पाटील, योगेश होरे, श्रीधर मगदूम, कलगोंडा मगदूम, मनोज पाटील, न्यायाधीश सौ. कल्पना होरे, डॉ. रामचंद्र होरे, आदिनाथ मगदूम, रायगोंडा पाटील, विजय मगदूम, सुरेश होरे, संतोष कवठेकर, रमेश होरे, अरुण कुबेर होरे, तसेच आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, वीर सेवा दल, गोमटेश ग्रुप, व वीर महिला मंडळ श्रावक श्राविका गेली दोन महिने परिश्रम घेत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.