jain samaj news : वाळव्यात श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी : वाळवा येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैनमंदिर कोटभाग यांच्यावतीने तब्बल 16 वर्षांनंतर 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान 7 दिवस श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, गावात मंगलमय वातावरण तयार झाले आहे.
jain samaj news : वाळव्यात श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी
कोटभाग जैनमंदिराच्या वेदी व शिखराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गेल्या 6 महिन्यापासून जैनबांधव श्रावक, श्राविका व कार्यकर्ते उत्साहात तयारीत व्यस्त आहेत. नागठाणे रस्त्यालगत पोपट दादू होरे यांच्या तीन एकर शेतजमिनीत भव्य व आकर्षक 400 बाय 150 फूट आकाराच्या मंडप उभारणीचे काम सुरु आहे. सदरचा कार्यक्रम कृष्णा नदीच्या तीरावर मंडपात होत असल्याने कार्यक्रमाला नैसर्गिक सौंदर्याचे वातावरण मिळणार आहे.
मंडपात धार्मिक कार्यक्रम, भोजनासाठी स्वतंत्रकक्ष अशी व्यवस्था असून, समोरच पार्किंगसाठी चार एकर क्षेत्रात व्यवस्था करण्यात आली आहे . सात दिवस चालणार्या कार्यक्रमासाठी मंडपात सात हजार श्रावक – श्राविकांची सोय होणार आहे तर परगांवहून महोत्सवात सहभागी होणार्या लोकांची निवास – भोजनाची व्यवस्था संयोजकांनी केली आहे.
नुकताच परिसरातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थीतीत मुहुर्तमेढीचा कार्यक्रम संपन्न झाला. प.पू.108आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज, नगरगौरव प.पू.108 निर्यापक श्रमणश्री धर्मसागरजी महाराज, व प .पू . 108 निर्यापक श्रमण आगम चक्रवर्ती विद्यासागरजी महाराज सह संघ यांच्या सानिध्यात व मार्गदर्शनाखाली हा महामहोत्सव होणार आहे.पूजाविधीसाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून नेज येथील संदेश उपाध्ये काम पाहणार आहेत.
महोत्सवासाठी धर्मानुरागी महावीर होरे व सौ. डॉ. वंदना होरे हे सौधर्म इंद्र इंद्रायणी असून, धर्मानुरागी राजेंद्र मगदूम, धर्मानुरागी महावीर होरेे, धर्मानुरागी सतीश होरे, धर्मानुरागी विनय होरे, धर्मानुरागी प्रकाश होरे, धर्मानुरागी प्रशांत मगदूम, धर्मानुरागी प्रदीप मगदूम, धर्मानुरागी संजय होरे, धर्मानुरागी प्रविण राजोबा, धर्मानुरागी उत्कर्ष होरे, धर्मानुरागी वर्धमान मगदूम यांनाही विविध मान मिळाले आहेत. संगीतसाथ सुशांत पाटील दानोही यांची आहे तर राजेंद्र जैन हेही कार्यक्रमात रंगत आणणार आहेत.
या मंगलमय सोहळ्यासाठी सकल दिगंबर जैन समाज , वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, धर्मसागर पाठशाळा, वीराचार्य झांज पथक व गोमटेश ग्रुप कोटभाग वाळवाचे तमाम श्रावक, श्राविका , तरुण कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



