jain samaj news : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या : अध्यक्ष भालचंद्र पाटील* : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले.
jain samaj news : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या : अध्यक्ष भालचंद्र पाटील*
ते म्हणाले, जैन समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र स्तवनिधी येथे दक्षिण भारत जैन सभेची 125 वर्षांपूर्वी स्थापना झाली. या सभेमुळे जैन समाज शिकला, प्रबोधित झाला, प्रगतीपथावर आरुढ झाला अशा या ऐतिहासिक समाज संघटनेत आतापर्यंत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. दिगंबर जैन समाजातील असंख्य युवक, युवती, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग व मार्गदर्शन लाभले म्हणून सभा मजबूत झाली.
ते म्हणाले, या पुढील काळात जैन समाजासमोरील आव्हाने पेलण्याची क्षमता समाजात निर्माण करणे, समाजाला ज्या त्या वेळी उचीत मार्गदर्शन व सहकार्य करून जैन समाजाला राष्ट्रीय प्रवाहात ठेवून समाजाची चौफेर प्रगती होण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेचा कार्यविस्तार व सभासद संख्या वाढवून दिगंबर जैन समाजातील सर्व पोट जातींनी दक्षिण भारत जैन सभेचे सभासद होणे आवश्यक आहे.
ही सभासद वाढ मोहीम हाती घेतल्याचे व दिगंबर जैन समाजातील सर्व पोट जातीतील वय वर्ष 18 पूर्ण केलेल्या सर्वांनी सभेची आजीव सभासद वर्गणी रु. 500 व सभेचे मुखपत्र प्रगती आणि जिनविजयची पंचवार्षिक वर्गणी रु. 1500 भरून सभासद व्हावे, तसेच यापूर्वीचे सभेचे आजीव सभासद व प्रगतीचे वर्गणीदार यांनी तातडीने घधउ (आधार कार्ड , पॅन कार्ड व अद्यावत रहिवासी संपूर्ण पत्ता इ.) पूर्तता तातडीने करून घ्यावी. असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी दक्षिण भारत जैन सभा मध्यवर्ती कार्यालय,37 महावीर नगर, सांगली, मोबाईल क्र. 9851071008 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



