rajkiyalive

KOLHAPUR LOKSABHA : प्रा. जालंदर पाटील लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त का?

जयसिंगपूर / अजित पवार, जनप्रवास

KOLHAPUR LOKSABHA : प्रा. जालंदर पाटील लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त का? :लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रणसिंग फुंकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये आणि अभ्यासू नेते प्रा. जालंदर पाटील मात्र या निवडणुकीपासून अलिप्त आहेत. त्यांनी अचानक माघार का घेतली असावी असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांना कोण मागे खेचतय का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

 

KOLHAPUR LOKSABHA : प्रा. जालंदर पाटील लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त का?

अचानक घेतलेल्या माघारीमुळे त्यांना मागे कोण खेचतय का सामान्य जनतेला प्रश्न

जयसिंगपूर येथे प्रतिवर्षी होणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत कारखानदारांचा लेखाजोखा, उसाचे गाळप किती झाले. त्यातून मिळणारी साखर किती टन प्राप्त झाली. बगॅस, मोलॅसिस, प्रशासन खर्च याबाबतचा सर्व व्यवहार कागदोपत्री अगदी आकडेमोड करून सांगणारे प्रा. पाटील हे या ऊस परिषदेत शेतकर्‍यांसमोर जोश आणतात. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ऊस परिषदेत त्यांनी आपल्या विवेचनपूर्ण भाषणामध्ये कोल्हापूर मतदारसंघातून जर नेत्यांनी आदेश दिला तर आपण नेतृत्व करण्यास आणि लोकसभा गाठण्यास आपण सक्षम असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. करारी बाणा आणि सोज्वळ वाणीतून निघालेले ते शब्द सध्या कुठे सिद्ध होताना दिसत नाहीत.

राज्यातील साखर कारखान्यांची आकडेमोड सांगणारे पाटील पेशाने प्राध्यापक आहेत.

भाषाशैलीवर प्रभुत्व असल्याने त्यांना कमीत कमी दोन तास जरी बोलण्याची संधी उपलब्ध झाली तरी ते मैदान मारल्याशिवाय राहत नाहीत. अशी त्यांची ख्याती आहे. पण ही ख्याती सध्या लोप पावल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना या निवडणुकीत आपण कोठे आहात असा प्रश्न सामान्य जनतेला आणि शेतकर्‍यांना पडला आहे. प्रा. पाटील हे या निवडणुकीपासून सध्या अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या अलिप्त असण्या मागचे नेमके कारण काय? त्यांनी केलेल्या सिंहगर्जनेचे झाले काय? असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे.

ज्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणार होते. त्या ठिकाणची अन्य पक्षांची उमेदवारी काही जणांना निश्चित झाली आहे.

यामध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली असल्याने हातकलंगलेतून ते स्वाभिमानी पक्षाच्या बळावर आणि शेतकर्‍यांच्या आत्मविश्वासावर निवडणूक लढविणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रा. पाटील हे सुद्धा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. सध्या का गप्प आहेत. असेही चित्र पहावयास मिळत आहे.

जोश आणि होश पूर्ण भाषणे…

जयसिंगपूर येथे होणार्‍या ऊस परिषदेत प्रा. जालं दर पाटील हे जोश पूर्ण आणि होश पूर्ण असे आपले मत व्यक्त करतात. कारखानदारांचा नफा- तोटा, मिळणारे उत्पन्न याचा लेखाजोखा ते आपल्या भाषणातून मांडतात. यामुळे त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली की टाळ्या पडायला सुरुवात होते. शेवटपर्यंत त्याचा नूर कायम राहायचा. पण गेल्या ऊस परिषदेपासून प्रा. पाटील यांचे एकही भाषण कोठे झाल्याचे ऐकिवात नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज