जत तालुक्यातील व्हसपेठ येथे विकास कामे करताना सरपंचाना अडथळा केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सहा सदस्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र केले आहे. याबाबतचा निकाल पूणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार दिला आहे.
jat news : व्हसपेठच्या उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र
विकासकामांत अडथळे आणल्याने विभागीय आयुक्तांची कारवाई
व्हसपेठ ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये झाली होती. या निवडणुकीत एका गटाच्या लोकनियुक्त सरपंच आणि तीन सदस्य विजयी झाले. विरोधी गटाचे सहा सदस्य विजय झाल्यामुळे त्यांच्या गटाचा उपसरपंच आहे. लोकनियुक्त सरपंच पूनम तुराई यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे विरोधी गटाकडून विकास कामात अडथळा आणला जात आहे. यासंबंधी सरपंच तुराई यांनी जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार विरोधी गटाच्या सदस्यांविरोधात कारवाईचा जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव गेला होता. विभागीय आयुक्तांनी यावर सुनावणी घेत निकाल दिला.
jat-news-six-members-including-the-deputy-sarpanch-of-vaspeth-disqualified
अपात्र झालेल्यांमध्ये उपसरपंच श्रीमती अर्चना विक्रम घोदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शहानूर अल्लीसो नदाफ, श्रीमती संगीता तानाजी हुवाळे, श्रीमती सुमन विकास जाधव, आप्पासो गुंडोपंत लेंगरे आणि सदस्य अंकुश मारुती कांबळे यांचा समावेश आहे. या निकालाने विकासकामांना अडथळा करणार्या विरोधी सदस्यांना चांगलाच दणका बसला असून ग्रामपंचायतीच्या राहिलेल्या कालावधीसाठी अपात्र करण्यात आले आहे.
संबंधितावर तात्काळ कारवाईची जिल्हा परिषदेला सूचना
व्हसपेठ ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यासंबंधीचे सहा सदस्यांना कल्पना देण्याबाबतची सूचना डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.