jayant patil news : गाताडवाडीत 1 मे रोजी 165 एकरावरील निचरा प्रणाली प्रकल्पाचा शुभारंभ : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कृत गाताडवाडी (ता.वाळवा) येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वतीने पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुरुवार दि.1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येत आहे. राज्याचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गाताडवाडी फाटा येथे हा समारंभ होत आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश बापू खोत,उपाध्यक्ष मधुकर हरी खोत यांनी दिली.
jayant patil news : गाताडवाडीत 1 मे रोजी 165 एकरावरील निचरा प्रणाली प्रकल्पाचा शुभारंभ
वाळवा तालुक्यात क्षारपड जमीन, जमिनीतील पाण्याचा निचरा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली हा मोठा उपाय आहे. त्या पार्श्वभूमीवर भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेत हा 165 एकरावर पथदर्शी निचरा प्रणाली प्रकल्प राबविला जात आहे. भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेची 2016 साली स्थापना केली असून संस्थेने माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कर्ज मुक्त केली आहे.
संस्थेला राज्य शासनाकडून 25 टक्के अनुदान मंजूर झाले आहे.
हा धनादेशही संस्थेस सुपूर्द केला जाणार आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा सर चिटणीस बाळासाहेब पाटील,माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,माजी उपसभापती नेताजी पाटील,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांच्यासह तालुक्यातील मान्यवर व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
jayant-patil-news-165-acre-drainage-system-project-inaugurated-in-gatadwadi-on-may-1
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,जल सिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कारखाना प्रतिनिधी राजकुमार कांबळे, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव डी.एम.पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील,संस्थेचे सचिव सचिन खोत या समारंभाचे आयोजन करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.