jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती दिनानिमित्त 21 हजार रूग्णांची तपासणी : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त संपूर्ण सांगली जिल्ह्यातील 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 21 हजार 217 रुग्णांच्या सर्वरोग तपासण्या व उपचार करण्यात आले. यातील 487 रुग्णांच्यावर पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती दिनानिमित्त 21 हजार रूग्णांची तपासणी
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या शिबीरांचे आयोजन केले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 41 वर्षापासून संपूर्ण सांगली जिल्ह्यात दरवर्षी या आरोग्य शिबिरां चे आयोजन केले जात आहे.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.विजयकुमार वाघ, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी 37 दिवसात जिल्ह्यातील 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरात 21 हजार 217 रुग्णांची सर्वरोग तपासणी व उपचार करण्या त आले.
यामध्ये रक्तदाब,लघवी, हिमो ग्लोबिन,ऍनिमिया निर्मूलनचा समावेश आहे. यातील 487 रुग्णांच्यावर ह्रदयरोग,अस्थि रोग,हर्निया,कान-नाक-घसा आदी पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शिबिरात 896 रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या,2908 रुग्णांच्या रक्त-साखर तपासण्या,तर 1722 रुग्णांच्या ईसीजी घेण्यात आले. कृष्णा हॉस्पिटल,मेहता हॉस्पिटल,सिनर्जी हस्पिटल,जयंत नेत्रालय, टेके आय हॉस्पिटल आदी जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे या शिबीरास मोलाचे सहकार्य लाभले आहे.
jayant-patil-news-21-thousand-patients-examined-on-the-occasion-of-loknete-rajarambapu-patils-memorial-day
लोकेनते राजारामबापू पाटील यांचे 17 जानेवारी 1984 रोजी साध्या सर्दीच्या आजाराने निधन झाले. त्या वर्षीपासून सातत्याने दरवर्षी शिराळा तालुक्यातील मणदूरपासून जत तालुक्यातील उमदीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्याबद्दल प्रबोधन,विविध आजारांच्या तपासण्या,उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या शिबिराचा जिल्ह्यातील साधारण 60-65 हजार रुग्णांना लाभ मिळत आहे.
जिल्ह्यातील स्मार्ट पीएचसी आणि आरोग्य शिबीरे॥
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी आपल्या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री कारकिर्दीत जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी योजना राबवित जिल्ह्यातील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट केला आहे. या केंद्रातमध्ये सध्या अद्यावत आरोग्य सोई- सुविधा दिल्या जात आहे. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेतून विविध शत्रक्रिया केल्या जात आहेत. त्याबद्दल रुग्णांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहेत. या सोई- सुविधांचा आरोग्य शिबिरांना अतिशय चांगला लाभ झाला आहे.
फोटो-लोकनेते राजारामबापू पाटील

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



