rajkiyalive

jayant patil news : 35 वर्षात साहेबांनी केलेली विकासकामे उघड्या डोळ्यांनी पहावीत ः प्रतिक पाटील

jayant patil news : 35 वर्षात साहेबांनी केलेली विकासकामे उघड्या डोळ्यांनी पहावीत ः प्रतिक पाटील : गेल्या 35 वर्षात साहेबांनी काय केले? याची साक्ष त्यांनी आष्टा-इस्लामपूर शहरासह मतदारसंघातील गावा-गावात उभा केलेली विकासकामे देतील. मात्र ही विकासकामे उघड्या डोळ्यांनी पहावी लागतील. साहेबांनी आपले उभे आयुष्य समाजाच्या सेवेला वाहिले, या तालुक्यातील माणूस घडविला. तालुका समृद्ध-संपन्न करीत राज्यात अग्रेसर ठेवला आहे याची जाणीव तालुक्याला आहे. त्यामुळे कोण काय म्हणते, याकडे लक्ष देण्याची गरज काय? असा सवाल युवा नेते, राजारामबापू सह.कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी प्रचार दौर्‍यात व्यक्त केली.

jayant patil news : 35 वर्षात साहेबांनी केलेली विकासकामे उघड्या डोळ्यांनी पहावीत ः प्रतिक पाटील

दौर्‍यात जेष्ठ, युवक व महिला मतदारांनी दादांचे उत्स्फूर्त स्वागत करीत आम्ही साहेबांच्या पाठीशी आहे असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रतिक पाटील यांनी कोळे, नरसिंहपूर, कि.म.गड, बेरडमाची, लवणमाची, शिरटे, येडेमच्छिंद्र, रेठरेहरणाक्ष, वाळवा, शिरगाव, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, दुधारी, बिचुद, भवानीनगर, बावची, पोखर्णी, नागाव, ढवळी, फारणेवाडी (शि), कोरेगाव, बागणी गावांचा झंझावाती प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला.

त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख होते. प्रतिक पाटील म्हणाले, साहेबांनी केवळ गेल्या 5 वर्षात 500 कोटीपेक्षा जास्त निधी आणून मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांची कार्य पुस्तिका आम्ही सर्वांना दिली आहे. इस्लामपूर शहरातील प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, न्यायालय इमारत, पोलीस स्टेशन, आष्टयाचे पोलीस स्टेशन इमारत, रेठरेहरणाक्ष पूल,

कसबेडिग्रज पूल, दुधगाव पूल, कोरेगाव पूल, नदीवरील घाट, गावांना जोडणारे रस्ते, ग्रामसचिवालये, गावातील अंतर्गत रस्ते, समाजमंदीरे ही कामे कोणी केली? विरोधक ज्या चौकात सभा घेतात ते व्यासपीठ आणि खुर्च्या ठेवतात त्या चौकातील पेव्हिंग ब्लॉकही साहेबांनी बसविले आहेत. आपले तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोचवा. प्रचार दौर्‍यात गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज