rajkiyalive

jayant patil news : ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा ः आ. जयंतराव पाटील

jayant patil news : ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा ः आ. जयंतराव पाटील : ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एका बाजूला 30 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनात वाढ होऊन दुसर्‍या बाजूला पाणी, खतात बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. आपला साखर कारखाना आपणास पूर्ण सहकार्य करेल. आपण प्रगतशील शेतकरी म्हणून ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा असे आवाहन माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी शेतकर्‍यांना केले.

jayant patil news : ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा ः आ. जयंतराव पाटील

राजारामबापू पाटील सह.साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू साखर कारखाना, ऍग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. राजारामबापू सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग, केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.विवेक भोईटे, ओंकार ढोबळे, ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, बारामती येथे एआय तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत वापर करून एकरी उत्पादन वाढते हे सिद्ध झाले आहे.

गेल्या 5 वर्षापासून ऑस्कफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने काम सुरु आहे. व्हीएसआय-केव्हीकेचा करारानंतर आपला कारखाना करार करेल. कारखान्याच्या ऊस विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी आपणास मार्गदर्शन करतील. कारखाना पाठीशी ठामपणे उभा राहील. पुढच्या टप्प्यात 10-15 हजार शेतकर्‍यांना सहभागी करून घेऊ. डॉ.अशोक कडलग म्हणाले, सध्या शेती करताना शेतकर्‍यांसमोर अनेक आव्हाने, अडचणी उभा आहेत.

ती कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.

क्षारपड जमिनीतही एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस शेतीत उत्पादन वाढ करू शकतो. डॉ.विवेक भोईटे म्हणाले, एआय तंत्रज्ञानात सॅटेलाईट, वेदर स्टेशन व सेन्सॉर यंत्रणेतून शेतकर्‍यांना मराठीतून अचूक माहिती दिली जाते. त्यातून पाणी, खत आणि किडींचे अचूक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होत आहे. सर्वांनी तंत्रज्ञानाचा वापर सुरू करायला हवा. सध्या तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश राज्यातील शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यावेळी त्यांनी एआय तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देत शेतकर्‍यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

jayant-patil-news-ai-technology-should-be-used-to-increase-per-acre-production-of-sugarcane-a-jayantrao-patil

कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने कारखाना राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती दिली. विनायक पाटील, विश्वासराव पाटील, शशिकांत पाटील, शिवाजीराव साळुंखे, संग्राम फडतरे, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, श्रेणीक कबाडे, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, शैलेश पाटील, डॉ.योजना शिंदे-पाटील, हणमंत माळी, रमेश हाके, राजकुमार कांबळे, माणिक पाटील, अभिजीत पाटील, माणिक शेळके, शहाजी माळी, विनायक पाटील, निलेश पवार यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी, शेती विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ऊसविकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज