दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
JAYANT PATIL NEWS : जयंत पाटील पॅटर्नचा राज्यभर डंका अजित पवारांचा यु टर्न की महायुतीमध्ये आमंत्रण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पॅटर्न राज्यभर सुरू करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विधानसभेत केली. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी खुलेआम जयंत पाटील पाटील यांचे कौतुक केले तेही विधानसभेत त्यामुळे निकालनंतर अजित पवारांनी यु टर्न घेतला आहे की जयंत पाटील यांच्या राज्यातील बोलबाल्याने त्यांना महायुतीचे निमंत्रण दिले आहेे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
AJIT PAWAR ON JAYANT PATIL : जयंत पाटील पॅटर्नचा राज्यभर डंका अजित पवारांचा यु टर्न की महायुतीमध्ये आमंत्रण
राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या विषयी प्रत्येक आठवड्यात एक नवी चर्चा होत असते. कधी त्यांच्या राजकारणाची तर कधी त्यांच्या विकासकामाची चर्चाही ठरलेली आहेच. कायमच प्रसिध्दीमध्ये असलेल्या जयंत पाटील यांची चर्चा आता त्यांच्या शाळा पॅटर्नची होत आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या पाठिशी राहणे पसंत केले.
लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटणीला दहा जागा आल्या त्यातील आठ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. या जाग जिंकण्यासाठी जयंत पाटील यांनी दिवसाचे रात्र केले. त्यांनी राज्यभरात एकून 103 सभा घेतल्या. त्याचे क्रेडीटही त्यांना मिळाले. राष्ट्रवादीचा सेनापती अशी उपाधीही त्यांना मिळाली. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवारांच्या वाटणीला केवळ चार जागा आल्या. त्यातील रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव विजयी झाले. अजित पवारांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनाही बारामतीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे निश्चितच राज्याच्या राजकारणात अजित पवारांपेक्षा जयंत पाटील यांचे पारडे वरचढ झाले आहे. याची जाणिव सवांर्ंनाच झाली आहे.
जयंत पाटील यांनी जिल्ह्यात राबविलेल्या शाळेचा पॅटर्न कौतुकास्पद असून, त्याचा हा पॅटर्न आम्ही राज्यभर राबवू अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. जयंत पाटील यांना सतत टोला मारणार्या अजित पवारांच्या तोंडून ही भाषा ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले. महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेतल्याने भाजप बँकफूटवर गेली आहे.
त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला महायुतीमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत शंका.
मिळाले तरी त्यांना मनासारख्या जााग मिळतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे अजित पवार आत्तापासून सावध झाले असावेत. पुढे मागे जर राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करायची वेळ आलीच तर जयंत पाटील यांनी विरोध करू नये हा त्यामागचा उद्देश असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे जयंत पाटलांचीही महात्वाकांक्षाही मोठी आहे. गेल्या सात निवडणुकीत निवडून आलेल्या जयंत पाटलांना आता राज्याचे नेतृत्व करायचे आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील वन मॅन शो आहेत. राज्यात 8 जागा जिंकून आणून त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत असे गेल्या कित्येक वर्षापासून बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना जर महायुतीमध्ये घेतले तर आपणही सेफ होवू असा विश्वासही अजित पवारांना वाटू शकतो. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदार संघात कोणताही पक्ष लागत नाही.
ते ज्या पक्षातून राहतात, ज्या चिन्हावर राहतात तेथे ते निवडून येतातच.
आजपर्यंत त्यांनी हात, घड्याळ या दोन चिन्हावर निवडण्ाूक लढवली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्यांनी घराघरात पोहोचविले आहे. त्यामुळे त्यांना पक्ष किंवा चिन्हाची फार आवश्यकता असते असे नाही. हे सर्वच पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना माहिती आहे.
येणार्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये जोरदार घमासान होणार आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाबरोबर इतर अनेक लहान सहान पक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या वाटणीला किती जागा मिळतील हे काही सांगता येत नाही. सर्वच मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे स्वत: शिवाय दुसरा माणूस नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उबाठाबरोबर जयंत पाटील एकटे चर्चा करू शकतात. तसे सर्वच अधिकार शरद पवारांना त्यांना दिलेले आहेत.
त्यामुळे ते खुलेआम मित्रपक्षांची चर्चा करू शकतात. त्यांच्यावर मित्रपक्षांचे दडपन नसते.
उलट अजित पवारांवर मित्र पक्षाचे दडपन असू शकते. त्यामुुळे अजित पवारांना जयंत पाटील यांची साथ हवी आहे की काय अशी ही शक्यता यातून निर्माण झाली आहे. एकंदरीत काहीही झाले तरी जयंत पाटील यांची चर्चा महाविकास आघाडी तर आहेच परंतु महायुतीमध्येही त्यांना घेतल्याशिवाय कोणतही चर्चा होवू शकत नाही, असे अजित पवारांच्या विधानावरून दिसून येत आहे.
पुन्हा एकदा प्रवेशाची चर्चा
अजित पवारांनी जयंत पाटील यांचे केलेल्या कौतुकाने पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, जयंत पाटील अजित पवार गटात जाणार, अजित पवार पुन्हा एकदा घरवापसी करून जयंत पाटील यांना साथ देणार अशा चर्चा ऐकावयास मिळत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



