rajkiyalive

jayant patil news : लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचे इव्हेंट दुर्दैवी : सुनिता देशमाने

वाढत्या महागाईने भगिनींच्या डोळ्यात पाणी आणले

jayant patil news : लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचे इव्हेंट दुर्दैवी : सुनिता देशमाने: आमचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांनी महिला भगिनींना 50 टक्के आरक्षण दिल्याने राज्यातील महिला भगिनी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, सभापतीपदावर कित्येक वर्षापासून सन्मानाने काम करीत आहेत. पवार साहेबांनी महिलांना घरासह संपत्तीमध्येही वाटा दिला. हे त्यांनी वडील म्हणून आपल्या लेकींसाठी केले. त्याचे कधी त्यांनी मार्केटींग केले नाही. मात्र लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलेले इव्हेंट दुर्दैवी असल्याची भावना महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी प्रचार दौर्‍यात बोलताना व्यक्त केली.

jayant patil news : लाडक्या बहिणीचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचे इव्हेंट दुर्दैवी : सुनिता देशमाने

दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या महागाईने आमच्या भगिनींच्या डोळ्यात पाणी आणले आहे, त्या आता तुम्हाला रडविल्याशिवाय रहाणार नाही असा टोलाही त्यांनी दिला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ सौ.देशमाने व महिला पदाधिकार्‍यांनी तुंग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, बावची, बागणी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, ढवळी, लोणारवाडी, मिरजवाडी गावांचा प्रचार दौरा करून महिलांशी संवाद साधला.

आ. जयंतराव पाटील यांनी मतदारसंघात कामाचा डोंगर उभा केला. महिलांना सन्मान आणि विविध पदावर संधी दिली आहे. तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मतदान करून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सौ.देशमाने म्हणाल्या, मोदीसाहेब आम्हाला 15 लाख रुपये देतो म्हणाले होते. त्यातील 1500 रुपये मिळाले. उर्वरित 14 लाख 98 हजार 500 रुपये कधी देणार? हे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्र्यांनी सांगावे. भाजपा सरकारने एका हाताने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि दुसर्‍या हाताने लाडक्या भावांचा खिसा मारला आहे.

राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील अनेक वृध्द, अपंग, विधवा, परित्यक्ता महिलांना कित्येक महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही. त्यांनी घर कसे चालवायचे? या प्रचार दौर्‍यात संचालिका मेघा पाटील, चारुलता पाटील, रूपाली ढोकळे, सुजाता पाटील, संगीता पाटील, मनीषा पाटील, युवती तालुकाध्यक्षा अँड.प्रियांका पाटील, वंदना शिंदे, मनीषा राने-पाटील, गीता मोहिते, गीतांजली इरकर, राजश्री मसुटगे, उज्वला पाटील, दिलशाद मुजावर, सुमित्रा निर्वाने, स्वाती कोथळे, अनिता घोडके, कमल साजणे, सुनीता आवटी, सुनंदा माने, आनंदी खोत यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज