jayant patil news : जयंत पाटील यांच्यामुळे वारणा धरणग्रस्तांना तब्बल 39 वर्षांनी मिळाला निर्वाह भत्ता : तब्बल 39 वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित सांगली जिल्ह्यातील 350 वारणा धरणग्रस्त खातेदारांना राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रत्येकी रुपये 1 लाख 85 हजार निर्वाह भत्ता निधी मंजूर झाला आहे. माजी जलसंपदा मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी खर्या अर्थाने या प्रश्नास गती देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वतीने आ.जयंतराव पाटील यांचा सत्कार करून धरणग्रस्तांनी आनंदोत्सव साजरा केला.
jayant patil news : जयंत पाटील यांच्यामुळे वारणा धरणग्रस्तांना तब्बल 39 वर्षांनी मिळाला निर्वाह भत्ता
धरणग्रस्तांचे कार्यकर्ते राम सावंत म्हणाले, ज्यांच्या जमिनी वारणा धरणात गेल्या आहेत, त्या धरणग्रस्त खातेदारांना महिन्याला रुपये 400 प्रमाणे निर्वाह भत्ता मिळायला हवा होता. मात्र 19 वसाहतीमधील 350 खातेदार तब्बल 39 वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित होते. आम्ही त्यासाठी सातत्याने मागणी आणि संघर्ष करीत होतो. माजी जलसंपदा मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी या प्रश्नास गती देऊन पाठपुरावा केल्याने हा निर्वाह भत्ता मंजूर झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यतील 350 खातेदारांना सध्या निर्वाह भत्त्याचे वाटप सुरू आहे. आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आम्ही आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी दिलीप पाटील ,मारुती रेवले, किरण पाटील, मुब्बारक कावनकर, महादेव पाटील, शंकर लोखंडे, लक्ष्मण सावंत, प्रकाश सावंत, तानाजी पाटील, रामचंद्र सोनावणे, भाऊ जाधव, लक्ष्मण पाटील, शंकर सावंत, बिरु येडगे, किसन मलप, प्रकाश सावंत, धोंडीबा सावंत, बाबुराव मोरे, मिथुन पवार, लक्ष्मण घोलप यांच्यासह शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.