jayant patil news : महाराष्ट्रातील सगळे मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? ः राजवर्धन पाटील: आपल्या राज्यातील लाखो युवकांच्या हाताला काम देणारे अनेक मोठ-मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? याचा विचार आपल्या राज्यातील जनता निश्चितच करत आहे. भाजपा महायुतीच्या सरकारने मोदी-शहा आणि गुजरातचे मांडलिकत्व पत्करल्याने महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. असा आरोप युवा नेते राजवर्धन जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत बोलताना केला. आ.जयंतराव पाटील यांचा विजय निश्चित असून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
jayant patil news : महाराष्ट्रातील सगळे मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? ः राजवर्धन पाटील
इस्लामपूर शहरातील मंत्री कॉलनी, बुरुड गल्ली, रामोशी गल्ली व शास्त्रीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर कोपरा सभेत ते बोलत होते. शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड.चिमण डांगे, पै.भगवान पाटील, अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, अॅड.धैर्यशिल पाटील, अरुण कांबळे, सुरेंद्र पाटील, संदीप पाटील, पुष्पलता खरात, राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र शिंदे, अॅड.आर.आर.पाटील, अॅड.आकीब जमादार, शिवसेना उ.बा.ठा.चे शकील सय्यद, उदय सरनोबत, आपचे गजानन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. राजवर्धन पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून इतिहास घडविला. भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडून त्यांना सुरतला नेत मराठी माणसाने उभा केलेला पक्ष फोडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला.
जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत हिसका दाखविला. ही दोन व्यक्तींमधील लढाई नसून दोन विचारामधील लढाई आहे. समोरच्या बाजूला गुजरातधार्जिण्य, पक्षबदलू, गद्दार आहेत. तर आपल्या बाजूला विचार, तत्व, स्वाभिमानाचे, महाराष्ट्र व सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणारे नेते आहेत. शहाजी पाटील म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांनी शहरातील घरपट्टी कधीही वाढू दिली नाही. मात्र अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांनी शहरातील घरपट्टी वाढविण्याचे पाप केले आहे. पै.भगवान पाटील म्हणाले, जे विधानसभेला उमेदवार म्हणून उभा आहेत.
त्यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात केलेले एक ठळक काम सांगावे. शकील सय्यद म्हणाले, उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आ.जयंतराव पाटील यांच्यामध्ये आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून राज्याचे मुख्यमंत्री होण्यास आशिर्वाद द्या. अरुणादेवी पाटील म्हणाल्या, आ.जयंतराव पाटील हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व आहे. त्यांना तुम्ही 35 वर्षात काय केले? हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अॅड.चिमण डांगे, दादासाहेब पाटील, अॅड.धैर्यशिल पाटील, गजानन पाटील, उदय सरनोबत, सुशांत कुर्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, माजी नगरसेविका उषाताई बाणेकर, अनिल पावणे, गोपाळ नागे, प्रियांका साळुंखे, प्राचार्य दीपा देशपांडे, पिरअली पुणेकर, मालन वाकळे, राहुल नागे, रणजित तेवरे, संजय जाधव, रणजित गायकवाड, राजू सावकार, नाझीम खाटीक, सर्जेराव बोडरे, आयुब हवलदार, दत्ता फल्ले यांच्यासह त्या-त्या परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला,पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



