rajkiyalive

jayant patil news : इस्लामपूरात चर्चा केवळ जयंत पाटलांच्या लीडचीच

jayant patil news : इस्लामपूरात चर्चा केवळ जयंत पाटलांच्या लीडचीच : सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे आहेत. सध्या त्यांच्या पक्षाला नवे चिन्ह मिळाले असून, तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यात जयंत पाटील यशस्वी झाले असून, सध्या मतदार संघात चर्चा आहे ती केवळ जयंत पाटील यांच्या लीडचीच.

jayant patil news : इस्लामपूरात चर्चा केवळ जयंत पाटलांच्या लीडचीच

गेल्या विधानसभेला जयंत पाटील 72 हजार मतांनी निवडून आले होते. यंदा लीड किती मिळणार याचीच चर्चा मतदार संघात ऐकायला मिळत आहे. जयंत पाटील यांनी पहिल्यांदा 1990 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी हात या चिन्हावर निवडणूक पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर 1995 मध्येही त्यांनी हाताच्या चिन्हावर दुसर्‍यांदा आमदार झाले. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी पवारांना साथ दिली. तेंव्हापासून 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवून आमदार, मंत्री झाले.

पाचवेळा घड्याळ या चिन्हावर लढलेल्या जयंत पाटलांना यावेळी घड्याळच्या विरोधातच लढावे लागत आहे. त्यांना नवीन चिन्ह मिळाले आहे ते तुतारी वाजविणारा माणूस. परंतु जयंत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते न डगमगता नवीन चिन्ह घराघरात पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. जयंत पाटील यांचे शेवटच्या कार्यकर्त्यांसमवेत थेट संबंध असल्याने त्यांना चिन्ह पाहोचविण्यात कोणतीच अडचण आली आहे. लोकसभेतही त्यांनी तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर 10 पैकी आठ खासदार निवडून आणले आहेत.

इस्लामपूर मतदार संघातील प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात, आष्टा, इस्लामपूर या मोठ्या शहरात तुतारी घुमत आहे. प्रत्येकाच्या तोंडात तुतारी वाजविणारा माणूसच आहे. त्यामुळे मतदारात उत्सुकता आहे ती जयंत पाटील यांच्या लीडचीच. काहीजण म्हणत आहेत की लाखाच्यावर लीड जाईल तर काही जण म्हणत आहेत की लीडचे विक्रम होईल. एकंदरीत इस्लामपूरा चर्चा आहे ती केवळ जयंत पाटील यांच्या लीडचीच….

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज