जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
jayant patil news : सत्ताधार्यांकडून जयंत पाटलांना ऑफर: राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना सत्ताधारी बाकावरुन त्यांना पुन्हा एकदा साद घालण्यात आली. यावेळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेला संवाद सध्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहे.
jayant patil news : सत्ताधार्यांकडून जयंत पाटलांना ऑफर
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विधानसभा सभागृहात फार गर्दी होते, अशी समस्या राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे उदाहरण दिले. ते असताना सभागृहात कशी शिस्त असायची, याबाबत जयंत पाटील सांगत होते. तेव्हा जयंत पाटील यांनी स्वत:चा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी ही चूक तात्काळ जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, बघा राहुल नार्वेकरांचं माझ्याकडे किती बारीक लक्ष असते. यावर सभागृहात एकच हशा पिकला.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत समोरच्या बाकावर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केले. ’विधानसभा अध्यक्षांनी तुमच्याकडे लक्ष देऊ काय फायदा, तुम्ही प्रतिसादच देत नाही.’ त्यावर जयंत पाटील यांनीही तितक्याच हजरजबाबीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांनी अजित पवारांकडे पाहून म्हटले की,’अजितदादा आमच्या पक्षाचे… आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’. जयंत पाटील यांच्या या हजरजबाबी उत्तराने सभागृहात पुन्हा हशा पिकला. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील : अमोल मिटकरी
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी म्हणाले की, जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. शरद पवार साहेबांचं आवडीचं गाणं आहे ’तुम इतना क्यू मूस्करा रहा हो’. त्यानुसार मे इतना मुसकरा रहा हू दिल मे खुशी छुपा रहा हू. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत.
गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. जयंत पाटील त्यावेळी हसले होते असंही अमोल मिटकरी म्हणाले.
जयंत पाटलांसारखे अनुभवी महायुतीत आले तर आनंदच : उदय सावंत
जयंत पाटील यांच्या भाषणात झालेले उल्लेख काही वेगळे संकेत आहेत का? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, ज्यावेळी विनोदाने काही चर्चा होते. सभागृहात अजित पवार जेव्हा म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. त्यानंतर जयंत पाटील असं बोलले आहेत की दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांचा कसा होतो? याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागलं आहे, असं सूचक विधान उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
आज झालेल्या भाषणात काही सूचक इशारा आहे असं वाटतं का? यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, भाषणातील काही वाक्य अधोरेखित करण्यासारखी होती. त्यातील योग्य वेळी योग्य निर्णय हे वाक्य होतं. त्यामुळे हे सत्यात कधी उतरेल हे जयंत पाटील यांनी ठरवलं पाहिजे. जयंत पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व, त्यांनी अनेकदा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अनेक खात्याचं काम पाहिलेलं आहे. असा नेता योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला चांगलं वाटेल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



