dineshkumar aitawade 9850652056
jayant patil news : जयंत पाटलांसाठी मिरज पश्चिम भागात जोरदार मोर्चेबांधणी आठ गावातील नेतेमंडळी सरसावले : इस्लामपूर मतदार संघातून राज्याचे नेते, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आठव्यांदा आमदार करण्यासाठी मिरज तालुका पश्चिम भाग सरसावला आहे. आठही गावातील प्रमुख नेतेमंडळीची बैठक होवून कोणत्याही परिस्थितीत आठ गावातून विक्रमी लीड देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यादृष्टीने प्रचार मोहिम राबविण्याची आखणी करण्यात आली.
jayant patil news : जयंत पाटलांसाठी मिरज पश्चिम भागात जोरदार मोर्चेबांधणी आठ गावातील नेतेमंडळी सरसावले
यावेळी कसबे डिग्रजे जयंतराव नलवडे, सरपंच तांबोळी, मौजे डिग्रजचे भालचंद्र पाटील, समडोळीचे माजी सरपंच वैभव पाटील, माजी सरपंच महावीर चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश पाटील, माजी उपसरपंच प्रमोद ढोले, कृष्णात मसाले, उपसरपंच अमजद फकीर, दुधगावचे विलास आवटी, सावळवाडीचे राहूल माणगावे, तुंगचे भास्कर पाटील, कवठेपिरानचे सचीन पाटील, सतिश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील यांच्या माध्यमातून मिरज पश्चिम भागातील सर्वच गावात गेल्या 20 वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजना, सामाजिक सभागृह, रस्ते, गटारी याबरोबरच इतर अनेक मोठमोठी विकासकामे झाली आहेत. जयंत पाटील यांचा या गावांवर विशेष जिव आहे. या गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचे थेट संबंध आहेत. त्यांच्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र राबण्याच्या तयारीत आहेत.
येणार्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, यात कोणतीची शंका नाही, त्यामुळे जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याची तयारी या भागातील नेतेमंडळींनी केली आहे.
24 रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन
येणार्या 24 ऑक्टोंबर रोजी आमदार जयंत पाटील इस्लामपूर मतदार संघातून अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राज्यभर त्यांचा दौरा असणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पक्षाचे उमेदवार ठरविण्याबरोबराच मित्र पक्षांची बोलणी करण्याचे महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे निवडणूक काळात ते मतदार संघात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 24 तारखेलाच ते सर्वांना भेटणार आहेत. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.